Bigg Boss 13 : रिपोर्टरनं शहनाजला सांगितला ‘फ्लिपर’चा अर्थ, ‘असा’ घेतला सिंगरचा ‘समाचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसमधील स्पर्धक शहनाज गिल आपल्या कूल स्वॅगमुले लोकांचं मन जिंकत असते. शहनाजची पूर्ण जर्नी खूप ड्रॅमॅटीक राहिली आहे. सीजनमध्ये ती कधीच एका टीमसोबत नव्हती. ती नेहमची फ्लिप करताना दिसली. शहनाजनं स्वत: तिला फ्लिपरचा टॅग दिला आहे.

मीडियाच्या प्रश्नात अडकली शहनाज गिल
बिग बॉसच्या येणाऱ्या भागात स्पर्धक मीडियाच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसणार आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, शहनाजला एका रिपोर्टरनं फ्लिपरवरून प्रश्न विचारला आहे आणि तिचा समाचार घेतला आहे. रिपोर्टरनं शहनाजला विचारलं, तुला फ्लीपर शब्दाचा अर्थ माहिती आहे का ? शहनाज म्हणाली, हो जो टीम बदलतो.

रिपोर्टरनं करेक्ट करत म्हटलं की, “याचा अर्थ होतो की, बिन पैंदे का लोटा. असा माणूस ज्याला पाठीचा कणा नसतो. जो आपल्या वक्तव्यावर ठाम नसतो.” नंतर शहनाजला विचारण्यात आलं की, “तुला वाटतं का, चाहत्यांनी तुला फ्लिपर म्हणून ओळखावं ?” यावर बोलताना शहनाज म्हणाली, ती तिच्या पद्धतीनं जात आहे. जर तिला फ्लिपर टॅग लागत असेल तर तिला काही अडचण नाही.

यानंतर रिपोर्टरनं पुन्हा एकदा विचारलं की, “जर बदनामीनं नाव होत असेल तर त्यात तू खुश आहेस का ?” शहनाज म्हणाली, “जे बरोबर आहे त्याचा स्टँड घेताना जर फ्लिप करावं लागलं तर त्यात काही अडचण नाही.” प्रोमो व्हिडीओत दिसत आहे की, मीडियाच्या प्रश्नांवर नाराज होऊन शहनाज प्रेस कॉन्फरंसमधून वॉकआऊट करते.