Shehnaaz Kaur Gill | अभिनेत्री शहनाज गिलच्या विंटर लूकने चाहते थक्क; शेअर केले खास लूकमधील फोटो


पोलीसनामा ऑनलाइन :
अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) नेहमीच तिच्या क्युटनेसने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असते. बिग बॉस मुळे शहनाज गिलला जास्त प्रसिद्धी मिळाली. नुकतेच तिने तिचे काही विंटर लूकमधील फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ‘बिग बॉस 13’ मुळे शहनाज (Shehnaaz Kaur Gill) घराघरात पोहोचली होती.

शहनाज नेहमीच आपल्या अभिनयाबरोबरच क्युटनेसने अनेकांची मने जिंकत असते. शहनाजने नुकतेच तिचे काही फोटोज शेअर केले आहेत. तिच्या या खास फोटोमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानीने शहनाजचे हे फोटो क्लिक केले आहेत. शहनाजच्या या विंटर लुकला चाहत्यांनी देखील पसंदी दर्शवली आहे.

या लुक मध्ये शहनाज (Shehnaaz Kaur Gill) व्हाईट स्वेटरमध्ये मोकळ्या केसात दिसत आहे.
या लूकमध्ये शहनाज खूपच गोड दिसत असल्याने चाहते कमेंट करून सांगत आहेत.
शहनाजच्या या फोटोवर ‘परी’, ‘क्युट’, ‘खूबसूरत’, ‘विंटर लूक ‘ अशा एक ना अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
तर आता लवकरच शहनाज ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title :- Shehnaaz Kaur Gill | bollywood shehnaaz gill share photo on social media