Birthday SPL : हिमांशीसोबतच्या वादानंतर पंजाबच्या ‘कॅटरीना कैफ’नं केला होता आत्महत्येचा प्रयत्न ! वडिलांनी सांगितले होते अनेक ‘सिक्रेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंजाबची कॅटरीना, बिग बॉस 13 ची एक्स स्पर्धक ॲक्ट्रेस शहनाज गिल (Shehnaaz Kaur Gill) हिचा आज 27 वा वाढदिवस आहे. आज चाहत्यांसह सेलेब्सकडूनही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. सिद्धार्थ शुक्ला सोबत रोमँससह अनेक गोष्टींमुळं ती चर्चेत राहिली. आज आपण थोडक्यात तिचा आजपर्यंतचा प्रवास आणि काही किस्सेही जाणून घेणार आहोत.

शहनाजनं मॉडेलिंगनं तिच्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर 2015 साली ती सिंगर गुरविंदर बरारच्या शिव दी किताब आणि कंवर चहल याच्या माझे दी जट्टी व्हिडीओत दिसली. यानंतर ती पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीचा ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा बनली.

बिग बॉसमध्ये येण्याआधी शहनाज आणि हिमांशी खुराना त्यांच्यातील दुश्मनीमुळं खूप वाादत होते. शहनाजनं लाईव्ह जात हिमांशीच्या आय लाईक इट या गाण्याला कचरा म्हटलं होतं. यावेळी तिनं हिमांशीसाठी काही अपशब्दही वापरले होते. तेव्हा हिमांशीनंही लाईव्ह जात तिला जशास तसं उत्तर दिलं होतं.

यानंतर दोघींमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसले. अनेकदा त्यांनी एकमेकांवर वाईट शब्दात कमेंट केली. शहनाजचे वडिल संतोख सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हिमांशीनं शहनाजला एवढं टॉर्चर केलं होतं की, तिनं वैतागून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

या खुलाशानंतर हिमांशीनं एक ट्विटही केलं होतं. हिमांशी म्हणाली होती की, जर तुमच्या मुलीनं माझ्यामुळं सुसाईड करण्याचा प्रयत्न केला असेल तर सॉरी. परंतु तुम्ही तुमच्या मुलीला समजावून सांगा. आधी स्वत:च वाद घालायाचा आणि नंतर स्वत:च डिस्टर्ब व्हायचं. तुमची मुलगी उलट एका मुलाखतीत बोलली होती की, वादामुळं मला काम मिळत आहे. तुम्ही विचार करून मुलाखत द्या.