शेख कुटुंबियांनी त्यांच्या घरातील पाच दिवसांच्या बाप्पांना दिला निरोप

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

उल्हासनगर मधील एका मुस्लीम कुटुंबांने घरी गणरायाची स्थापना केली होती. या शेख कुटुंबाने सर्व जाती धर्माचे उत्सव सर्वधर्म समभावाने साजरे करण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. जाती धर्माच्या भिंती तोडून साजरा करण्यात आलेल्या या गणपती बाप्पांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे शहरातील भाविकांनी गर्दी करत शेख कुटुंबियांच्या या बाप्पाचे दर्शनही घेतले. पाच दिवसांच्या या बाप्पांना शेख कुटुंबियांनी अत्यंत जड अंतकरणाने निरोप दिला.

[amazon_link asins=’B01M22EOOX,B01HSEOJWK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9146bac6-baf7-11e8-bb61-0b10f0770be6′]

उल्हासनगरच्या कॅम्प ५ परिसरात जमील शेख हे कुटुंबासह अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहे. शेख कुटुंबाने त्यांच्या घरी ५ दिवस गणपती बसवण्याचा निर्णय घेतला होता.  विशेष म्हणजे कुटुंबातील सर्वच सदस्यांनी पुढाकार घेत घरातच ५ दिवसांच्या बाप्पाची स्थापना केली. जमील यांचे सर्व कुटुंब उत्सवात सहभागी होत बाप्पामय झाले होते. बाप्पाची दररोज सकाळ संध्याकाळ विधीवत पद्धतीने पूजा-अर्चा आणि आरती  शेख कुटुंबीय करत होते.

सर्वत्र चर्चेचा विषय झालेल्या शेख कुटुंबियांच्या या गणरायाबाबत जमील शेख यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, आम्ही मुस्लीम असलो तरी हिंदू आणि मुस्लिमांचे सर्वच सण साजरे करतो. जितक्या उत्साहाने ईद साजरी करतो, तितक्याच भक्तिभावाने आम्ही बाप्पाची पूजा करतो. मध्यमवर्गीय असलेल्या शेख यांच्या या कृतीचे उल्हासनगरमध्ये कौतुक होत आहे. पाच दिवसांच्या या बाप्पांना मोठ्या जड अंतकरणाने शेख कुटुंबियांनी निरोप दिला.

प्रसिद्धी विनायक : राज ठाकरे यांचे व्यंगचित्रातून मोदींवर पुन्हा फटकारे

मागील पंचवीस ते तीस वर्षात जातीभेद, धर्मभेद नामशेष होण्याची प्रक्रिया मोठ्या वेगाने सुरू होती. महाराष्ट्र तर पुरोगामी म्हणून मिरवू लागला होता. मात्र, मागील चार-पाच वर्षांपासून आपल्या राज्यातच नव्हे तर देशभरात धर्मांधता वाढत चालल्याचे दिसून येत आहे. सध्या जातीभेद, धर्मभेदाला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. असे असताना शेख कुटुंबियांनी श्री गणरायाची प्रतिष्ठापना करून एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.