Shekhar Channe | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंप तत्वावर महामंडळात समाविष्ट करणार, ST महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळे विभागाला 200 नवीन बसेस मिळणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी दिली आहे. कोरोनाच्या कालावधीनंतर राज्य परिवहन महामंडळाची स्थिती पूर्वपदावर येऊ लागलेली आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाने धुळे जिल्ह्यासाठी 200 नवीन बसेस दिल्या असल्याचे शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी सांगितले.

 

धुळे विभागासाठी नवीन बसेस खरेदी करण्यात येत असून, आगामी एक-दीड महिन्या धुळे-नंदुरबार जिल्ह्याला 100 नवीन बसेस मिळतील. त्यानंतर सहा महिन्यांत 100 इलेक्ट्रिक (Electric Bus) अशा एकूण 200 नवीन बसेस दिल्या जातील, अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी दिली.

 

शेखर चन्ने यांनी काल महामंडळाच्या धुळे विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी शेखर चन्ने म्हणाले की, कोरोनामुळे बससेवा ठप्प असल्याने महामंडळाला मोठा फटका बसला होता. मात्र आता 90 टक्के परिस्थितीत सुधारणा झालेली असून, पूर्वीप्रमाणेच सर्व मार्गावर बसेस धावू लागलेल्या आहेत. महामंडळाच्या अनेक बसेसची झालेली दुरवस्था बघता नवीन बसेस घेण्यात येत आहेत. काही कालावधीत इलेक्ट्रिक बसेसही महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट होतील. धुळे विभागाला (धुळे-नंदुरबार जिल्हा) Dhule and Nandurbar District येत्या एक-दीन महिन्यांत 100 नवीन बसेस तर आगामी सहा महिन्यांत 100 इलेक्ट्रिक बसेस (Electric Buses) मिळतील. लांब पल्यासह ग्रामीण भागातील सर्व शेड्यूल्ड वेळेवर कसे सुरू राहतील याकडे लक्ष देण्यात येईल.

तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शासन वेळोवेळी मदत करीत आहे.
असे असतानाही पगार मिळत नसल्याने, काही कर्मचारी संप करण्याच्या पावित्र्यात असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावली.
धुळ्याच्या बसपोर्टचा प्रश्न अनेक वर्षांपासून लालफितीत अडकला आहे, याविषयी ते म्हणाले,
बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना एअरपोर्टच्या धर्तीवर सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

 

2019 मध्ये चालक-वाहक पदासाठी भरती (Driver-Carrier Recruitment) प्रक्रिया राबविण्यात आली होती.
अनेकांची निवड होऊनही त्यांना कामावर हजर करून घेतले नाही. आता या तरुणांची भरती प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच कोरोनाबरोबरच संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांच्या पाल्यांनाही अनुकंप तत्वावर सेवेत समाविष्ट करून घेण्याचे विचाराधीन आहे.
विभागाला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या धुळे आगाराच्या असुविधेबद्दल ते म्हणाले,
येथील आागरात चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

 

Web Title :- Shekhar Channe The children of employees who died due to Corona will be included in the corporation on compassionate grounds, according to the managing director of ST Corporation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sandipan Bhumre | नाराज संजय शिरसाटांना मंत्रिपद मिळणार की लटकवणार, मंत्री भुमरे स्पष्टच बोलले…

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Subhash Desai | घोडा मैदान आता लांब नाही, शेलारांच्या टीकेला सुभाष देसाईंचे प्रत्युत्तर