‘… तर स्टार सिस्टीम संपुष्टात येईल’, प्रसिद्ध डायरेक्टरनं साधला बॉलिवूडवर निशाणा

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  सध्या देशासह जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. अशात 3 महिन्यांच्या लॉकडाऊनमुळं फिल्म इंडस्ट्रीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. सिनेमा आणि टीव्हीच्या शुटींगला तर हळू हळू सुरुवात होत आहे. परंतु 3 महिन्यांपासून बंद असणारे सिनेमा हॉल अजूनही बंदच आहेत. सद्य स्थिती पाहता अजून वर्षभर तरी सिनेमा हॉल सुरू होतील असं वाटत नाही. अशात अनेक सिनेमे आता ओटीटीवर रिलीज होताना दिसत आहेत. यावर आता बॉलिवूड डायरेक्टर शेखर कपूर यांनी भाष्य केलं आहे. ओटीटीमुळं बॉलिवूडमधील स्टार सिस्टीम संपून जाईल असा दावा शेखर कपूर यांनी केला आहे. शेखर यांनी स्टार सिस्टीमवर टीका केली आहे.

शेखर कपूर यांनी ट्विट करत त्यांचं म्हणणं स्पष्ट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “किमान पुढील वर्षभर तरी सिनेमा हॉल सुरू होणार नाहीत. यामुळं पहिल्याच आठवड्यात 100 कोटींची कमाई आता बंद होईल. याचा फटका बॉलिवूडमधील स्टार सिस्टीमलाही बसणार आहे. ही स्टार सिस्टीम आता संपुष्टात येणार आहे.”

आपल्या ट्विटमध्ये पुढं बोलताना शेखर कपूर म्हणतात, “लहान असो किंवा मोठा स्टार असो सर्वांनाच आता रिलीजसाठी ओटीटी वर यावं लागणार आहे. टेक्नॉलॉजी आता खूप सोपी झाली आहे.” शेखर कपूर यांनी आपल्या ट्विटमधून बॉलिवूडमधील स्टार सिस्टीमवर निशाणा साधला आहे. त्यामुळं सध्या त्यांचं हे ट्विट खूप चर्चेत आहे.