Homeमनोरंजनबिहार निवडणुका संपताच भडकला शेखर सुमन, म्हणाला 'आता माझी माफी मागा'

बिहार निवडणुका संपताच भडकला शेखर सुमन, म्हणाला ‘आता माझी माफी मागा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Case) प्रकरणावर सतत भाष्य करत प्रतिक्रिया देणाऱ्या अभिनेता शेखर सुमन (Shekhar Suman) याला अनेकांनी ट्रोल केलं होतं. अनेकांचं म्हणणं होतं की, त्याला बिहार निवडणुकीचं तिकीट हवं होतं म्हणून तो प्रयत्न करत आहे. परंतु आता निवडणूक होताच शेखरनं ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.

शेखरनं ट्विट करत त्यांचं म्हणणं मांडलं आहे. शेखर म्हणतो, सुशांत प्रकरणाच्या निमित्तानं मी तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांची भेट घेतली तेव्हा माझ्यावर राजकारण केल्याचा आरोप केला जात होता. माझ्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी मी असं केल्याचा आरोप माझ्यावर केला गेला. आता बिहार निवडणुका संपल्या आहेत आणि मला काहीही फरक पडलेला नाही. मी आजही सुशांत सिंह प्रकरणावरच बोलतोय. त्यामुळं आता ट्रोलर्सनं माझी माफी मागावी असं म्हणत त्यानं ट्रोलर्सवर टीका केली आहे.

शेखरचं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या ट्विटवर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअरही केलं आहे.

अलीकडे शेखरनं मिलिंद सोमन (Milind Soman) याच्या न्यूड फोटोवरून त्याच्यावर टीका केली होती. मिलिंदचं वय 55 झालं आहे. परंतु त्याच्या कृती अद्याप लहान मुलांसारख्यच दिसताहेत. उमर पचपन की, हरकतें बचपन की असं त्यानं म्हटलं होतं.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News