शेखर सुमन रियावर भडकला, म्हणाला – ‘इतका महागडा वकिल कसा ‘हायर’ केला, स्पॉन्सर कोण ?’

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत जनतेपासून अनेक बॉलीवुड सेलेब्सने न्यायाची मागणी करत सीबीआय तपासाची मागणी केली होती. यामध्ये शेखर सुमनचे नाव सुद्धा आहे. शेखर सुमनने सुशांतच्या मृत्यूनंतर अगदी बिनधास्तपणे सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसल्याचे पहिल्या दिवसापासून म्हटले आहे.

आजतकसोबत बोलताना शेखर सुमन यांनी आपले मत व्यक्त करताना रिया चक्रवर्तीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याच्या जाण्यानंतर त्याच्या कुटुंबासोबत थोडातरी वेळ घालवता. परंतु, रियाने यूटर्न घेतला. तसेच केस लढण्यासाठी रियाने भारतातील सर्वात महागडा वकील हायर केला आहे, प्रत्यक्षात तिचे वार्षिक इन्कम 14 लाख रूपये आहे. यामुळे प्रश्न हा उपस्थित होतो की, अखेर तिने इतका महागडा वकील कसा हायर केला. तिला कोण स्पॉन्सर करत आहे.

शेखरने सुशांतच्या मृत्यूशी संबंधीत अन्य बाबींवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले, सीबीआय आपले काम सक्षमपणे करेल. खरे चित्र समोर येईल. मी कुणाकडे बोट दाखवत नाही, पण शंकेची सूई स्वाभाविकपणे अनेक लोकांकडे जात आहे. कारण प्रत्येकाचा जबाब वेगवेगळा आहे. सिद्धार्थ पिठानीपासून अ‍ॅम्ब्यूलन्स वाला, प्रत्येकजण वेगवेगळे बोलत आहे. त्यांचे जबाब एकमेकांशी मॅच होत नाहीत. असे वाटते त्यांना कॅरेक्टर दिले गेले होते, पण ते अ‍ॅक्टर नाहीत त्यामुळे योग्य प्रकारे रोल करू शकले नाहीत.

शेखर सुमन यांनी सुशांतच्या पोस्टमार्टमबाबत सुद्धा शंका व्यक्त केली. ते म्हणाले की, दिशा सालियानचे पोस्टमार्टम 2 दोन दिवसात केले गेले, कारण कोविड-19 ची स्थिती होती, मग सुशांत प्रकरणात इतकी घाई केली. तेथे कोविड-19 ची केस अप्लाय होत नाही का. इतकी घाई होती की, त्याचे पोस्टमार्टम अवघ्या काही तासात करण्यात आले. तर मृत्यूच्या एक महिन्यानंतर सुशांतचे घर सील करण्यात आले, येथे एवढा उशीर का.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सुप्रीम कोर्टने सर्व बाबींचा विचार करून सीबीआयला केसच्या तपासाची जबाबदारी दिली आहे.