Sher Shivraj Box Office Collection | ‘शेर शिवराज’ चित्रपटाने पहिल्या दिवशी केली ‘इतकी’ कमाई !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Collection) शौर्यगाथेवर आधारित चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj Box Office Collection) रिलीज झाला आहे. मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) यांनी महाराजांच्या शौर्यगाथेवर एकूण आठ चित्रपट बनवले आहेत. यातील ‘फर्जंद’ (Farzand), ‘फत्तेशिकस्त’ (Fatteshikast), ‘पावनखिंड’ (Pawankhind) आणि आता ‘शेर शिवराज’ हा चित्रपटगृहांमध्ये आला आहे. ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj Box Office) चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे.

 

शेर शिवराज चित्रपटाचं ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. प्रसिद्ध ट्रेड अनॅलिस्ट तरण आदर्श यांनी शेर शिवराज या चित्रपटाची कमाई जाहीर केली असुन पहिल्या दिवशी चित्रपटाने तब्बल 1.5 कोटींची कमाई केली आहे. तरूणांच्या व्हाट्सॲप स्टेटसवर चित्रपटगृहातील स्टेटस झळकताना दिसले.

 

 

चित्रपटाला जरी चांगला प्रतिसाद मिळत असला तरी प्रेक्षकांना मात्र एक बदल हा आवडलेला नाही. शेर शिवराज चित्रपटामधील महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख ‘बहिर्जी नाईक’ (Bahirji Naik) यांंचं पात्र स्वत: दिग्पाल लांजेकर यांनी साकारलं आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

दरम्यान, आधीच्या ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’मध्ये बहिर्जी नाईक यांची भूमिका ही हरिश दुधाडेने (Harish Dudhade) साकारली होती.
प्रेक्षकांना नाईकांच्या भूमिकेमध्ये हरिश दुधाडे याला पाहण्याची सवय लागली होती.
याबाबत सोशल मीडियावर त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.
तर काहींना दिग्पाल यांना बहिर्जींच्या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title :- Sher Shivraj Box Office Collection | digpal lanjekars marathi latest movie sher shivraj first day box office collection

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा