अयोध्या ! शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी 51 हजार दिले, म्हणाले – ‘राम मंदिर हिंदुस्थानच्या गौरवाची गोष्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अयोध्या रामजन्मभूमि वादावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर आता शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी मोठा निर्णय घेतला असून त्यांनी मंदिरनिर्मितीसाठी 51 हजार रुपये देणगी दिली आहे. रामजन्मभूमि न्यासच्या नावाने त्यांनी चेक पाठवला आहे. याचबरोबर त्यांनी निकालावर समाधान व्यक्त करत म्हटले आहे की, ज्यावेळी मशिदीची निर्मिती केली जाईल, त्यावेळी बोर्ड त्यासाठी देखील मदत करेन. राममंदिर हा संपूर्ण जगतात भारतासाठी गौरवाची गोष्ट आहे. त्याचबरोबर ते अयोध्येला जाऊन रामजन्म भूमि न्यासच्या अध्यक्षांबरोबर देखील चर्चा करणार आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्यांनी म्हटले की, वक्फ बोर्ड आपल्या कामामध्ये यशस्वी झाला असून या ठिकाणी राममंदिर व्हावे अशी आमची देखील इच्छा होती.

सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला
शनिवार 9 नोव्हेंबर रोजी चीफ जस्टीस रंजन गोगोई यांनी केवळ 43 मिनिटांमध्ये भारतातील सर्वात मोठ्या खटल्याचा निकाल दिला. 40 दिवसांच्या सुनावणीनंतर अखेर न्यायाधीशांनी हा निर्णय दिला. या कालावधीत दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये निर्मोही अखाडा या जागेवरील आपल्या हक्काचा पुरावा न देऊ शकल्याने त्यांची याचिका फेटाळण्यात आली.

त्यामुळे 2.77 एकर विवादित जमीन हि रामलल्लाला मिळाली. त्यामुळे तेथे राम मंदिर उभे राहण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. याची जबाबदारी एका ट्रस्टला देण्यात आली असून तीन महिन्यांच्या आत या ट्रस्टची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर मुस्लिम पक्षकारांना मशीद उभारणीसाठी दुसऱ्या ठिकाणी पाच एकर जमीन देण्याचे आदेश देण्यात आले असून अयोध्येमध्ये किंवा बाहेर देखील सरकार हि जमीन देऊ शकते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like