‘शिकारा’ च्या स्पेशल स्क्रिनिंगनंतर डायरेक्टरवर भडकली ‘ती’ महिला, म्हणाली…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – डायरेक्टर विधु विनोद चोपडा यांच्या शिकारा या सिनेमाची नुकतीच दिल्लीत स्पेशल स्क्रिनिंग झाली. 7 फेब्रुवारीलाच सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा आता नव्या वादात सापडला आहे. दिल्लीतल्या कनॉट प्लेसच्या थिएटरमध्ये ही स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आली होती. सिनेमा संपल्यानंतर जेव्हा चोपडांनी ऑडियंस सोबत संवाद साधाला. तेव्हा एका महिलेनं काश्मीरी पंडितांच्या दुर्दशेचं व्यावसायिककरण करण्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला. ढसाढसा रडणाऱ्या या महिलेनं चोपडांना खूप काही ऐकवलं.

खरं दु:ख दाखवलं नसल्याचा महिलेचा आरोप
सदर महिलेनं आरोप केला की, चोपडांनी खरं दु:ख दखवलंच नाही. यात इस्लामिक कट्टरपंथीयांनी केलेला नरसंहार, सामूहिक बलात्कार आणि हत्या या गोष्टी आहेत. महिला म्हणाली, “तुम्हाला या व्यापारीकरणासाठी शुभेच्छा. काश्मीरी पंडित या नात्यानं मला तुमचा सिनेमा मान्य नाही. मी हे सिनेमा नामंजूर करते.”

मुस्लिम अ‍ॅक्टर्सच्या कास्टींगबद्दल प्रश्नचिन्ह
या महिलेनं लिड रोल करणाऱ्या मुस्लिम अ‍ॅक्टर्स (आदिल खान आणि सादिया) यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. ती म्हणाली, “तुम्ही एखाद्या काश्मीरी पंडित अ‍ॅक्टर्सनाही कास्ट करू शकत होतात. परंतु तुम्ही मुस्लिम अ‍ॅक्टर्सची निवड केली. हे राजकारण का केल ?” चोपडांनी काश्मीरी पंडितांच्या वेदनांचं ध्रुवीकरण केल्याचंही तिनं सांगितलं.

यावेळी विधु चोपडांनी महिलेचं सांत्वन करत तिला सांगितलं की, ते या सिनेमाचा सिक्वलही करतील. त्यांनी या महिलेसाठी टाळ्याही वाजवल्या. चोपडा म्हणाले, “सत्याचे दोन चेहरे असतात. एकाच मुद्द्यावर लोकांचं वेगवेगळं मत असतं.”