Shikara Movie Review : काश्मीरी पंडितांचं दु:ख प्रेमाच्या शाईनं लिहिलेला ‘शिकारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काश्मीरमधील स्थिती सर्वांनाच माहिती आहे. काश्मीर सुरुवातीपासूनच अडचणीत आहे. दहशतवादी हल्ले, लोकांवरील अत्याचार, कर्फ्यू, सुविधा न मिळणं, इंटरनेट बंद होणं अशा अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो. या लोकांमध्ये समाविष्ट आहेत काश्मीरी पंडित. जे आपल्याच देशात रेफ्युजी म्हणून राहतात. डायरेक्टर विधु विनोद चोपडा यांचा शिकारा हा सिनेमा त्याच दु:खाला एका प्रेमकहाणीच्या माध्यमातून मांडतो.

शिव धर आणि त्याची पत्नी शांती धर यांची स्टोरी या सिनेमात पहायला मिळत आहे. जे पंडित आहेत आणि शांत व आनंदी जीवन जगत आहेत. हा काळ 80 च्या शेवटाचा आहे. शिव व शांतीला आपलंच स्वत:च राहतं घर सोडून दुसरीकडे जावं लागतं. कारण सांप्रदायिक तणाव खोऱ्यात पसरायला सुरुवात झालेली असते.

परफॉर्मंस

शिकारा सिनेमातून अ‍ॅक्टर आदिल खान आणि सादियानं बॉलिवूड डेब्यू केला आहे. दोघांनीही चांगलं काम केलं आहे. शिव कुमार धरच्या भूमिकेत त्यानं जीव ओतला आहे. शिवनं शिक्षकाची भूमिका साकारली आहे. श्रीनगरच्या अमरसिंह कॉलेजमध्ये ते मुलांना शिकवत असतात.

सादियानंही शांतीला रोल चांगला केला आहे. स्वप्नांच्या घरातून बाहेर पडत रेफ्युजी म्हणून राहणं, भीती वाटत असूनही आशा न सोडणं, शिवला प्रत्येक वेळी साथ देणं, सर्वकाही हसत हसत करत असते. सादियाचे अश्रू तिचा भोळेपणा, दु:ख आणि आनंद तुम्हाला हादरून टाकणारा आहे. आदिल आणि सादिया यांचा रोमांस आणि केमिस्ट्री खूप सुंदर आहे. जम्मूच्या मुठी कॅम्पमध्ये राहणारी ही जोडी तुम्हाला खूप आवडेल.

 डायरेक्टर

हा सिनेमा पाहून असं वाटतं की, डायरेक्टर विधु विनोद चोपडा, अभिजात जोशी आणि राहुल पंडित यांनी काश्मीरी पंडितांच्या दु:खाला प्रेमाच्या शाईनं लिहिलं आहे. एक अशी प्रेमकहाणी जी वेळ, तिरस्कार आणि युद्धासमोर टिकून आहे. विधु विनोद चोपडा यांनी शिव आणि शांती यांचा रोमांस तर दाखवल आहेच परंतु काश्मीरचा तो चेहरा दाखवला आहे जो कदाचित बातम्यांमध्ये दिसला नसावा.

काश्मीरी पंडितांची घरं जाळणं, रातोरात लोकांना घर सोडायला भाग पडणं, रस्त्यावर गोळ्यांचा वर्षाव आणि लोकांनी आपला जीव गमावणं असं बरंच काही यात दाखवलं आहे. आपला देश सोडणं एखाद्यासाठी किती अवघड असतं हे सिनेमात दिसतं. कशी तुमची वेळ बदलते तरीही जुन्या आवठणी तुम्हाला पोखरतात.