इथिओपियातील विमान दुर्घटनेत भारतीय महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

नैरोबी :  वृत्तसंस्था – इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाहून नैरोबीला जाणाऱ्या इथिओपिअन एअरलाइन्सचे विमानाने उड्डाण घेताच ६ मिनिटांच्या आत अपघाग्रस्त झाले होते. यामध्ये सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. इथिओपिअन एअरलाइन्सच्या विमान अपघातात बळी पडलेल्या भारतीयांची संख्या ४ वरुन ६ इतकी झाली आहे. हे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. दरम्यान, या मृतांमध्ये पर्यावरण मंत्रालयातील संयुक्त राष्ट्रांच्या सल्लागार शीखा गर्ग यांचाही समावेश असल्याची माहिती  केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

इथिओपियातील विमान दुर्घटनेमध्ये १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका भारतीय कुटुंबातील ६ जणांचा समावेश आहे, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. या विमान दुर्घटनेतील मृतांची नावेही स्वराज यांनी प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये वैद्य पन्नागर भास्कर, वैद्य हासिन अन्नागेश, नुकारवारपू मनीषा आणि शिखा गर्ग यांचा समावेश आहे.

या मृतांच्या कुटुंबियांना सर्वप्रकारची मदत करण्याचे आदेश इथिओपियातील भारतीय उच्चायुक्तांना देण्यात आले आहेत. इथिओपियाच्या विमान दुर्घटनेविषयी बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की , ‘मी वैद्य यांच्या टोरंटोतील मुलाशी फोनवरुन चर्चा केली. मात्र, त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबातील ६ व्यक्तींना गमावल्याचे कळताच आपल्याला खूपच दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच इथिओपिया आणि केनयातील भारतीय दुतावासाशी संवाद साधत त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास सांगितली आहे.

‘इथिओपिया एअरलाइन्सचे हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजूनअडतीस  मिनिटांनी आदिस अबाबा येथून नैरोबीकडे रवाना झाले होते. दरम्यान, उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच विमानाशी असलेला संपर्क तुटला. आदिस अबाबापासून ६० किमी अंतरावर असलेल्या बिशोफ्टू येथे हा अपघात झाला आहे.