आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या कारकिर्दीत पहिल शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने (101)) चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. चेन्नईच्या संघाने विजयासाठी ठेवलेले 180 धावांचं आव्हान दिल्ली संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण कले. अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी 17 धावांची गरज होती. त्यावेळी जाडेजाच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने 3 षटकार लगावत दिल्ली संघाकडे विजयश्री खेचून आणली.

धवनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं. आयपीएल 2020 हंगामातील हे तिसरं शतक ठरलं. बंगळुरूविरूद्ध पंजाबचा कर्णधार राहुलने दमदार शतक ठोकलं होतं. त्यानंतर राजस्थानविरूद्ध पंजाबच्या मयंक अग्रवालने दुसरं शतक लगावल होत. आयपीएलच्या 13 वर्षांच्या इतिहासात पहिली 3 शतकं भारतीय फलंदाजांनी लगावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या आधी 2011 च्या हंगामात पहिली दोन शतकं भारतीय खेळाडूंच्या बॅटमधून निघाली होती. 2011च्या हंगामात पंजाबकडून खेळताना पॉल वल्थाटीने पहिले शतक तर मुंबई इंडियन्सच्या सचिन तेंडुलकरने हंगामातील दुसरं शतक ठोकलं होतं. पण धवनने शतक ठोकत इतिहास रचला.

गब्बरच्या धडाकेबाज खेळीपुढे चेन्नई फेल
फाफ डु प्लेसिस, अंबाती रायुडू आणि रविंद्र जाडेजा यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने 179 धावांचा पल्ला गाठला. शेन वॉटसन आणि डु प्लेसिस जोडीने महत्वपूर्ण भागीदारी केली. वॉटसन 36 धावांवर बाद झाला पण डु प्लेसिसने 58 धावा केल्या. या दोघांनंतर अंबाती रायडू (45) आणि जाडेजा (33) यांनी संघाला 179 चा आकडा गाठून दिला.180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. पण शिखर धवनने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याने 58 चेंडूत नाबाद101 धावा कुटल्या. तर अक्षर पटेलने 5 चेंडूत 21 धावा करत संघाचा विजय साकारला.