विंडीजविरूध्दच्या वनडे मालिकेपुर्वी टीम इंडियाला जबरदस्त धक्का, ‘हा’ महत्वाचा खेळाडू संघाबाहेर

मुंबई :  पोलिसनामा ऑनलाईन –  टी-२० मालिका झाल्यानंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका खेळण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला असून वेस्ट इंडिज च्या सामन्यात भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. मिळालेली माहिती अशी की भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन या तीन एकदिवसीय मालिकेत नसणार आहे. कारण शिखर धवनला दुखापत झाली असल्याने त्याला संघाबाहेर जावे लागणार आहे. भारतीय संघ शिखर धवन च्या जागी मयांक अग्रवालला संधी देणार असल्याचे उघड झाले आहे.

शिखर धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली असल्यानं मयांकचा संघात समावेश करण्यात आला आहे. सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान शिखर धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दरम्यान धवनच्या दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनचा समावेश करण्यात आला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्याआधी शिखर धवन तंदरुस्त होईल अशी माहिती होती परंतु तसे न झाल्याने मयांकलाच खेळवण्यात येईल असे समजते. धवनला या एकदिवसीय मालिकेस मुकावे लागले असून भारतीय संघाला देखील थोड्याफार अडचणींना सामोरे जावे लागेल. कारण धवनची खेळी ही संघासाठी नेहमी निर्णायक ठरली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/