Shikhar Samiti On Maharashtra Tourism | पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांना शिखर समितीची मान्यता ! गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्प 2024 मध्ये पूर्ण करावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shikhar Samiti On Maharashtra Tourism | राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध पर्यटन प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. राज्यात पर्यटनवाढीसाठी (To Increase Tourism In Maharashtra) मोठा वाव असून प्रत्येक विभागातील पर्यटनस्थळांचा दर्जा वाढवितानाच पर्यटकांच्या सोयीसाठी त्याठिकाणी चांगले रस्ते, दळणवळणाची साधने, निवासाची दर्जेदार व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. (Shikhar Samiti On Maharashtra Tourism)

 

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत गोसीखुर्द येथे जलपर्यटन (Cruise At Gosikhurd) , नागपूर येथील सोनेगाव तलावाचे सुशोभीकरण (Beautification of Sonegaon Lake), कार्ला लोणावळा Karla Caves (Lonavala) येथे चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स (Chanakya Center for Excellence), मिठबाव येथील गजबादेवी मंदिर (Gajaba devi Temple, Mithbav) सुविधा प्रकल्प यांना यावेळी मंजुरी देण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यावेळी उपस्थित होते. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) , सिंधुदूर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. (Shikhar Samiti On Maharashtra Tourism)

 

गोसीखुर्द जलाशय जिल्हा भंडारा (Bhandara) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या Maharashtra Tourism Development Corporation (MTDC) माध्यमातून करण्यात येणार आहे. यावेळी या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. गोसीखुर्द जलाशयात ४५ किमी जलप्रवास पात्र आहे. याठिकाणची नैसर्गिक विविधता, मोठ्या बेटांची आणि बंदरांची उपलब्धता असल्याने आंतरराष्ट्रीय जलपर्यटन करण्यात येणार आहे.

देशातील सर्वोत्तम असा हा जलपर्यटन प्रकल्प वेळेपूर्वी जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हा प्रकल्प भंडारा आणि नागपूर या दोन्ही जिल्ह्यांच्या किनाऱ्यावर होत असून याठिकाणी सुरू असलेला अंभोरा मंदीर विकास प्रकल्प आणि जलपर्यटन प्रकल्प एकत्रित करण्याची सूचना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

 

एमटीडीसीच्या माध्यमातून लोणावला कार्ला येथे करण्यात एमआयसीई सेंटर (Lonavala Karla MICE Center)आणि चाणक्य सेंटर फॉर एक्सलन्स संदर्भात सादरीकरण करण्यात आले. कार्ला येथील एमटीडीसी पर्यटक निवासाला एमआयसीई (मिटींग, इन्सेटिव्ह, कॉन्फरन्स, एक्झीबिशन) सेंटर करण्यात येणार आहे. मुंबईच्या जवळ हा परिसर असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक येतात त्यांना याठिकाणी दर्जेदार सुविधा मिळायला हवी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

कोयना बामणोली येथे स्कुबा डायव्हिंग तातडीने सुरू करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
नागपूर येथील सोनेगाव तलावाच्या सुशोभीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आले.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मिठबाव येथील गजबा देवी मंदिर परीसराचा पर्यटनदृष्ट्या विकास
करण्याबाबत आराखडा सादर करण्यात आला. भाविकांसाठी चांगल्या सुविधा देतानाच बगीचे,
रस्ते करून पर्यटनवाढीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीस महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर (IAS Nitin Karir),
नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा (IAS Rajgopal Deora),
पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय (IAS Saurabh Vijay) आदी उपस्थित होते.
यावेळी नागपूर (Nagpur), भंडारा, सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्हाधिकारी यांनी सादरीकरण केले.

 

Web Title :  Shikhar Samiti On Maharashtra Tourism | The approval of the summit committee for various projects
promoting tourism! Gosikhurd Tourism Project to be completed in 2024; Chief Minister Eknath Shinde’s instructions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा