शिक्रापूर : पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर आता पोलीस कर्मचाऱ्याच्या खातेनिहाय चौकशीची मागणी

शिक्रापुर – पुणे ग्रामीण पोलीस दलातील बहुचर्चित शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्यानंतर आत्ता शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील एका पोलिस कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी शिक्रापूर मधील एका व्यक्तीकडून लेखी निवेदना द्वारे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी निवेदन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे यांना दिल्याचे म्हटले आहे.