Shikrapur : Facebook वर ओळख करून महिलेवर अत्याचार

शिरुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर (Shirur) तालुक्याच्या रांजणगाव गणपती हद्दीत फेसबुकवर ओळख झालेल्या तरुणाने तेवीस वर्षीय महिलेला धमकी, दमदाटी करून बलात्कार (Rape) केल्याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषी जयराम जाधव (रा.निफाड,जि.नाशिक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित महिलेने रांजणगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून फेसबुकवर ओळख झालेला मुलगा ऋषी जयराम जाधव याने पिडितेस निघोज कुंड,मळगंगादेवी येथे त्याच्या मोटारसायकलवर फिरण्यासाठी घेवुन गेला होता. त्यावेळी आरोपी याने त्या दोघांचे फोटो त्याचे मोबाईलवर काढले होते.

त्यानंतर ता. 30/9/2020 रोजी फिर्यादी राहत असलेल्या रांजणगाव येथील घरी येवुन, मला तुझ्याशी शारीरिक संबंध करून दे, अन्यथा तुझे फोटो फेसबुक वर पाठवून, तुझी बदनामी करेन अशी धमकी देत आरोपी याने फिर्यादीशी त्यांचे इच्छेविरूदध दोन ते तीन वेळा महीलेवर अत्याचार केले. याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे या करत आहेत.