शिक्रापुरात आढळला इसमाचा मृतदेह, प्रचंड खळबळ

शिक्रापूर  : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असल्याने परिसरात खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर येथील समाज मंदिरा जवळ राहणारे दिलीप चव्हाण हे त्याच्या घराजवळील एका मोकळ्या खोलीत कपडे वाळत टाकण्यास गेले असताना, शेजारील घरातून उग्र वास येत असल्याचे त्यांना जाणवले, यावेळी चव्हाण यांनी शेजारील खोलीत पाहिले असता एका पुरुषाचा मृतदेह असल्याचे त्यांना दिसले.

यावेळी त्यांनी शेजारील नागरिकांना याबाबत सांगितले, या घटनेची माहिती मिळताच तात्काळ शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस हवालदार पुनाजी जाधव, पोलीस शिपाई अमोल रासकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता त्या इसमाबाबत काहीही माहिती अथवा त्याचे नातेवाईक मिळू शकले नाही, यावेळी मृतदेहाची पाहणी केली असता तोंडाचा भाग विद्रूप झाल्याचे दिसले तर सदर मृतदेह तीन ते चार दिवसांचा असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने या इसमाच्या मृतदेहाबाबत तर्कवितर्क बोलले जात आहे, याबाबत तेजस दिलीप चव्हाण वय १८ वर्षे रा. शिक्रापूर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like