रांजणगाव : कंपनीमध्ये जावून अधिकार्‍यांना मारहाण करण्याची धमकी अन् शिवीगाळ, दोघांविरूध्द FIR दाखल

रांजणगाव – पंचताराकित औद्योगिक क्षेञ असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये येउन कंपनी अधिकाऱ्याला मारहाण करण्याची, धमकी देऊन,शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशन येथे दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कंपनीतील संतोष संपत भापकर यांनी रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दादा मदने व सनी मदने (दोघे रा.ढोकसांगवी तालुका शिरूर जिल्हा पुणे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रांजणगाव एमआयडीसी मधील पॉलीप्लॅस्टिक इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये दादा मदने रा. ढोकसांगवी ता. शिरूर जि. पुणे हा आला व त्यास फिर्यादी भापकर यांनी रिसेप्शन मध्ये थांबण्यास सांगितले असता तो जबरदस्तीने कपंनीतील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जाऊन अधिकाऱ्यां सोबत उद्धटपणा चे वर्तन केले व त्याचा सोबत असलेल्या सनी मदने याने तोंडाला मास्क न लावता गेटवरून फिर्यादीस दमदाटी करून विनापरवानगी जबरदस्तीने कंपनी मध्ये गेला व परत बाहेर जाण्याकरता आला तेव्हा त्याने घाणेरडी शिवी देऊन मला कंपनी मध्ये जाताना अडवायचे नाही नाहीतर तोंड फोडून टाकीन अशी धमकी दिली याप्रकरणी संतोष भापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघा जणांवर कलम ४५२,४४७,२९४,५०४,५०६,२६९,१८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात आला असून यातील आरोपीना रांजणगाव MIDC पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तेलंग करायचा आहे.