शिक्रापूर ,कोरेगाव आता पुढील 14 दिवस ‘लॉकडाऊन’

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ) –  शिरुर तालुक्यातील शिक्रापूर,कोरेगाव भिमा सह आजूबाजूच्या गावांमध्ये या आठवडाभरात अनेक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असल्यामुळे तसेच रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शिक्रापूर ,कोरेगाव भिमा ही गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत चे पञक देखील दोन्ही ग्रामपंचायत कडून काढण्यात आले आहे.

शिक्रापूर येथे आठवडाभरात सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर कोरेगाव भिमा मध्ये देखील रुग्ण आढळून आले तसेच आजूबाजूच्या देखील अनेक गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये भाजीपाला संबंधित जास्त व्यक्तींचा समावेश आहे, तर दररोज कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने दोन्ही ग्रामपंचायतने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेबंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी गावामध्ये खबरदारीच्या उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे सांगत शिक्रापूर आणि कोरेगाव भिमा मधील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.