Shikrapur News | कंपनीतील कामाच्या पैशाच्या वादातून एकाला मारहाण, 2 जणांवर FIR

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Shikrapur News | सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतीतील (Sanaswadi Industrial Estate) कंपनीत केलेल्या कामाचे पैसे न दिल्याच्या रागातून दोन जणांनी एकाला काठीने बेदम मारहाण (Beaten) केल्याची घटना शिरुर (Shikrapur News) तालुक्यातील सणसवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) दोघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

नारायण नामदेव हरगुडे, दत्तात्रय नामदेव हरगुडे (दोघे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी महादेव सुदाम हरगुडे (वय 41 रा. चेअरमन वस्ती, सणसवाडी, ता. शिरुर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी येथील औद्योगिक वसाहतीमधील एका ठेक्यामधून केलेल्या कामाचे पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी महादेव यांना मारहाण केली. सणसवाडी येथील एका रोडचे काम चालू असताना दत्तात्रय हरगुडे व नारायण हरगुडे हे दोघे त्या ठिकाणी आले. त्यांनी कामाचे पैसे न मिळाल्याच्या रागातून महादेव यांना शिवीगाळ, दमदाटी करत महादेव यांचे रस्त्याचे काम बंद केले. तसेच काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे (Police Inspector Hemant Shedge) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अतुल पखाले (Atul Pakhale) हे करत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Shikrapur News | One beaten up over work money dispute in company, FIR on 2 people

Pimpri Crime | ‘मी बाहेर आल्यावर सोडणार नाही, पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस चौकीत धमकी’

Mumbai High Court | उच्च न्यायालयाची ठाकरे सरकारला सूचना; ‘लसीकरण झालेल्यांना लोकल प्रवासाची मुभा द्या’

Pooja chavan Suicide Case | पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला महत्त्वाचा पुरावा, संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ?

Mumbai Local | वकिलांचा फ्रंट लाईन वर्करमध्ये समावेश, वकिलांना लोकल प्रवासाची मुभा; राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण, जाणून घ्या आजचे दर