शिक्रापूर : उपसरपंच निवडीच्या सत्कारासाठी मंदिरात व ग्रामपंचायत मध्ये गर्दीच गर्दी, सोशल डिस्टेन्सिंगचा फज्जा

शिक्रापुर : शिरूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिक्रापूर येथे पदाचे ग्रहण लागलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यावेळी माञ कोरोना संकट काळातील शासनाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे .विशेष म्हणजे शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर असलेल्या ग्रामपंचायत मध्ये हा प्रकार घडून देखील पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही त्यामुळे पोलीस याकडे लक्ष देणार का ?अशा सवाल गावातील काही सुजाण नागरिक करत आहे.

शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच जयश्री दोरगे यांनी राजीनामा दिल्यामुळे त्याच्या जागी नुकतीच उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली, यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये रोहिणी गिलबिले यांची उपसरपंच पदी वर्णी लागली मात्र उपसरपंच निवडणूक पार पडत असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी केल्याचे दिसून येत आहे.तसेच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये देखील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक नागरिकांच्या तोंडावर मास्क देखील परिधान केलेले नव्हते, तर कोरोनाचे संकट असताना देखील नागरिक आणि गावचे पुढारी इतक्यावरच न थांबता त्यांनी ग्रामदैवत मंदिरामध्ये नवनिर्वाचित उपसरपंच यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. यावेळी देखील नागरिकांनी गर्दी केली. परंतु निवडीमध्ये उतावळे झालेल्या काही पुढार्‍यांना कोरोना संकटामुळे घालून दिलेल्या शासनाच्या नियमांचा विसर पडला. उपसरपंच यांचा सत्कार करताना अनेकांनी मास्कचा वापर देखील केला नाही.मोठया प्रमाणात गर्दी जमुन उपसरपंच यांचा सत्कार केला काही वेळात याबाबतचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आणि त्यानंतर गावातील काही नागरिकांकडून यावर कारवाई होणार का? असे बोलले जाऊ लागले .पोलीस स्टेशन समोर सर्व प्रकार घडलेला असताना देखील शिक्रापूर पोलीस प्रशासन अद्याप गप्प का ? . तर काही दिवासापुर्वीच शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका वाढदिवस पार्टीवर सह एका डॉक्टरांच्या पार्टीवर तसेच बाजार समितीच्या सभापती निवडीनंतर सभापती वर गुन्हा दाखल करत कारवाई करणारे पोलीस याकडे लक्ष देऊन या वर गुन्हा दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.