भर चौकात उभा राहून अश्लील हावभाव करणार्‍या 2 महिला ‘गोत्यात’

शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथील चाकण चौक परिसरात सार्वजनिक रस्त्यावर उभे राहून शरीरविक्री व्यवसायासाठी काही महिला अश्लील हावभाव करत असल्याची माहीती मिळाली तर काही महिला लॉजवर वेश्याव्यवसाय करत असल्याचे प्रकार अनेक दिवसांपासून सुरु असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी कारवाई करत दोन महिलांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथील चाकण चौक परिसरात अनेक दिवसांपासून काही महिला वेश्याव्यवसाय करत असताना, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, महिला पोलीस राणी भागवत, गिता बराटे, रुपाली निंभोरे, स्नेहल गायकवाड यांनी त्या ठिकाणी जात वाहनांच्या आडोशाला उभे राहून पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अश्लील हावभाव करून वेश्याव्यवसायासाठी खुणावीत असल्याचे निदर्शनास आले, यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या महिलांना जागेवर पकडून ताब्यात घेतले, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस कर्मचारी राणी पंढरीनाथ भागवत यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दोन महिला महिलांविरुद्ध वेश्याव्यवसाय प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट हे करत आहे.