शिक्रापुर पोलिसांना मोठे यश ! ATM फोडणारी परप्रांतीय टोळी गजाआड

शिक्रापुर – पुणे जिल्ह्यातील शिक्रापुर पोलिसांना मोठे यश आले असून पिंपळे जगताप येथील चौफुला परिसरात अज्ञात चोरट्यांनी आयडीबिआय बँकेचे एटीएम फोडून त्यातील २१ लाख ८४ हजार ६०० रुपये लांबविले होते शिक्रापूर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून या गुन्ह्यातील आरोपींना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेत गजाआड केले आहे .

शिरुर तालुक्याच्या पिंपळे जगताप येथील आयडीबीआय बँकेचे एटीएम आलिशान कार मधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पाच नोव्हेंबर रोजी एटीएम मधील सीसीटीव्ही वर काळा स्प्रे मारून एटीएम मशीन फोडून त्यातील २१ लाख ८४ हजार ६०० रुपये पळवून नेले होते. याबाबत आयडीबीआय बँक शाखा (पिंपळे जगताप) व्यवस्थापक रोहन चावडी पांडे (वय ३७ वर्षे रा. केसनंद रोड वाघोली) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.

शिक्रापूर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील आरोपी मध्यप्रदेश राज्यातील असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, पोलीस शिपाई निखील रावडे, जयकुमार देवकर, अमोल नलगे, प्रतिक जगताप यांनी मध्यप्रदेश जावून आरोपीना ताब्यात घेतले.

यामध्ये मासिउल्लाह अख्तर (वय २१ राईपुरी ता. नुहू जि. नुहू राज्य हरियाना), शाहजात उर्फ शहादत हाजर खान (वय २५ वर्षे रा. पिनगुंवा ता. पुनहाना जि. नुहू, राज्य हरियाना), शमशेर उर्फ दलशेर फजरू मेवाती (वय ४० वर्षे रा. गंगोरा ता. पहाडी जि. भरतपूर राज्य राजस्थान), आसमोहम्मद फाजरुद्दिन (वय ३४ रा. नलगीपठाण पोस्ट लगडवास ता. किसनगढ जि. अलवर राज्य राजस्थान), मुशरीफखान उर्फ शरीफ कमरुद्दीन खान (वय वय २७ वर्षे रा. सरस्वत पुनहाना जि. नुहू राज्य हरियाना), शाकीर फजरू मेवाती (वय ३३ वर्षे रा. रा. गंगोरा ता. पहाडी जि. भरतपूर राज्य राजस्थान सध्या रा. गैस राहत कॉलनी ता. निशाद्पूर जि. भोपाळ )अशी शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेश मधून ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीचे आदेश दिले आहे या आरोपीकडून अजूनही एटीएम फोडीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.