वाहनातून स्पिरीट चोरणार्या दोघांना शिक्रापूर पोलिसांकडून अटक, 48 लाखाचा माल जप्त
शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास टँकरमधून स्पिरिट चोरी करणाऱ्या दोघांना सापळा रचून मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अंबादास थोरे यांनी फिर्याद दिली असून उमेश बबन मोरे (वय 26 रा.सोलापुर) सुरेंदरसिंग ग्यानसिंग बोपाराये ( वय 44 रा.पजांब) यांना शिक्रापुर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर चाकण रोडलगत जातेगाव खु. जवळ तीन टँकर मधून एका छोटा हत्ती गाडीत ठेवलेल्या बॕलर आणि कॕन मध्ये चोरुन स्पिरीट काढून घेतले जात आहे.अशी गोपनीय माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी , पोलीस कॉन्स्टेबल अंबादास थोरवे, होमगार्ड योगेश बेंद्रे, मनोहर पुंडे यांनी दोन पंचासह त्या ठिकाणी छापा टाकला असता टँकरमधून चोरीच्या उद्देशाने स्पिरिट काढूत असल्याचे आढळून आले.
पोलिसांना पाहताच आरोपीनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले .यावेळी तीन टॅंकर , एक छोटा हत्ती गाडी ,200 लिटराचे 5 बॕलर,35 लिटरचे 7 कॕन असे एकूण 1245 लिटर चोरून काढलेले स्पिरीट आढळून आले. असा एकूण47,62,250 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी करत आहे