शिक्रापूर पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा ! 15 जणांवर कारवाई तर रोख रक्कमेसह 17.85 लाखाचा माल जप्त

शिक्रापूर : प्रतिनिधी ( सचिन धुमाळ ) –  शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने फुटानवाडी येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण १५ जणांवर कारवाई करत सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की शिक्रापूर पोलिसांना फुटानवाडी येथे काही व्यक्ती तीन पत्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठाच्या आदेशाने शिक्रापुर पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे दिसल्या. पोलिस आल्याची चाहूल लागताच अनेकांनी पळ काढला मात्र पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेतले .

या प्रकरणी युवराज सुदाम बगाटे, प्रवीण सुदाम बगाटे, सुदाम हरिशेठ बगाटे यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार, जुगार साहित्य, रोख रक्कम, वाहने असा सर्व मिळून तब्बल १७ लाख ८५ हजार ६७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डाॕ. अभिनव देशमुख यांच्या आदेशाने दौंड उपविभाग विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर चे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या पथकाने केली आहे.

याबाबत पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान शिक्रापूरच्या पोलीस निरीक्षकाकडून खुपच गोपनीयता पाळण्यात आली होती, कर्मचाऱ्यांना देखील कारवाई दरम्यान मोबाईल बंद ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.