शिक्रापूर पोलिसांकडून गावठी रिव्हॉल्वर जप्त

शिक्रापुर / प्रतिनिधी – शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांनी शिक्रापूर पोलिसांनी पाठलाग करत ताब्यात घेतले. शिक्रापूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मौखिक आदेशाने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शिक्रापूर परिसरामध्ये गस्त घालत असताना. पो. ना अमोल दांडगे, पो.कॉ.मिलींद देवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिक्रापूर चाकण चौक येथे दोन इसम गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार आहे.

अशी खाञीलायक माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांना याबाबत कल्पना देउन त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापुर चाकण चौक येथे सापळा रचून दोघांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यांना त्यांची नाव विचारले असता नितीन जाधव (वय२५) रा.भांडेगाव ता. बार्शी जि. सोलापूर व किरण भरत कोळी (वय२४) रा. भांबर्डे रोड रांजणगाव (मुळगाव गोरधावले जळगाव) असे सांगितले . त्यांची अंगझडती घेतली असता नितीन जाधव याच्या कमरेला एक काळ्या रंगाचा गावठी रिव्हाल्वर मिळून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, दौड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश तावसकर ,पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पो. ना. अमोल दांडगे,पो.ना. योगेश नागरगोजे, पो. कॉ. मिलिंद देवरे पो. कॉ.किशोर शिवणकर, पो. काॕ. लक्ष्मण शिरसकर यांनी केली.

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अशाप्रकारे कोणी बेकायदेशीर पणे हत्यार बाळगत असल्याची माहिती असल्यास नागरिकांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केली.