पोलिसांसह भू-मापक अधिकाऱ्याला मारहाण, शिक्रापुर पोलिस स्टेशन मध्ये FIR दाखल

शिक्रापुर , पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील शिक्रापूर येथे हिवरे रोड लगत असलेल्या जमिनीची मोजणी आणि हद्द कायम करण्याचे काम सुरु असताना भूमापक अधिकाऱ्यासह बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की करत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन महिला पोलीस किरकोळ जखमी झाल्या आहेत .याबाबतीत शासकीय कामात अडथळा केल्या प्रकारणी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये महिला व पुरुषांसह नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबतीत मिळालेल्या माहिती नुसार शिक्रापूर ता. शिरूर येथे गट नंबर ३७० मधील जमीन कासारी येथील राजेंद्र रासकर यांनी विकत घेतलेली होती, या जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातून पोलीस बंदोबस्ताची मागणी केलेली होती, त्यानुसार शिक्रापुर पोलिस स्टेशनकडून मोजणीसाठी पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, महिला पोलीस सिमा बोचरे, स्नेहल गायकवाड हे त्या ठिकाणी बंदोबस्तसाठी गलेले होते यावेळी भूमापक रवींद्र शेळके हे त्यांच्याजवळील जमीन मोजणी यंत्राच्या सहाय्याने मोजणी करता असताना नवनाथ भुजबळ, गोरक्ष कळमकर यांसह काही व्यक्ती व महिला त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी जमीन मोजणीस आक्षेप घेतला, यावेळी भूमापक शेळके हे सदर लोकांना सदर जमिनीचे क्षेत्र येथे असल्याचे समजावून सांगत असताना तेथे जमलेल्या लोकांनी शेळके यांना शिवीगाळ, दमदाटी करत शेळके यांचे जमीन मोजणी यंत्र फोडून टाकण्याची धमकी देत अंगावर धावून जाऊन शेळके यांना मारहाण करू लागले, यावेळी पोलीस त्यांना समजावून सांगत असताना जमलेल्या लोकांनी पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करत महिला पोलीस कर्मचारी सिमा बोचरे व स्नेहल गायकवाड यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरवात केली, यावेळी महिला पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्या आहेत, त्यानंतर शासकीय नियमानुसार सुरु असलेले जमीन मोजणीचे सुरु असलेले काम देखील बंद करण्यात आले.

याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश विठ्ठल चव्हाण रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे, त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी नवनाथ सिताराम भुजबळ, गोरक्ष बबन कळमकर, वंदना नवनाथ भुजबळ, गोरक्ष नवनाथ भुजबळ, शिवाजी रामचंद्र भुजबळ, रतन शिवाजी भुजबळ, कल्पना कुशाल कळमकर, संतोषी गोरक्ष कळमकर, वर्षा भगवान भुजबळ यांच्यावर बेकायदा गर्दी जमाव जमवून, शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहे .

या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट व अविनाश पठारे हे करत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like