शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत कर्मचाऱ्यांची खांदेपालट होण्याची शक्यता !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणे ग्रामीण पोलीस दलातील महत्वाचे पोलीस स्टेशन समजले जाणारे शिक्रापूर पोलीस स्टेशन सध्या जिल्ह्यांमध्ये खूपच चर्चेत आहे . नुकतेच शिक्रापूरचे माजी पोलीस निरीक्षक व काही कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता.त्याचाबरोबर पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांमधील वातावरण देखील दूषित झाल्याचे बोलले जात होते तर त्या संबंधित माजी पोलिस निरीक्षकावर देखील जनमानसात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली होती. याची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी संबंधित वादग्रस्त पोलिस निरीक्षकाची पुणे नियंत्रण कक्ष येथे तडकाफडकी बदली केली. त्यानंतर आता शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यान्वित असलेल्या काही अंमलदारांची देखील खांदेपालट होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांनी पोलिस स्टेशन मधील सर्व अंमलदारांना कोणाला कोणत्या ठिकाणी काम करण्याची इच्छा आहे या बाबत अर्ज देखील सादर करण्यास सांगितले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामुळे पोलीस स्टेशन अंतर्गत खांदेपालट होणार हे मात्र खरे ! या खांदेपालटामुळे विशिष्ट बीट,विशिष्ट जबाबदारी सांभाळून मागेपुढे करणाऱ्या अमलदारांची धाकधूक मात्र वाढली आहे.