शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 12 जण हद्दपार

शिक्रापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षीच्या गणेशोत्सव व मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन नंतर आता शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बारा जणांना हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलिसांनी लॉकडाऊन काळामध्ये पोलीस स्टेशन मध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींची यादी बनवून पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या सुचनेनुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयकडे कार्यवाही करण्यासाठी पाठवली होती त्यांनतर दौंड विभागचे अतिरिक्त उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांनी अमोल नारायण हंबीर, सुरेश लक्ष्मण गायकवाड, योगेश बबुशा दरेकर, गणेश लक्ष्मण बालगुडे चौघे रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे, भीमराव बाबुराव ढमढेरे रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरूर जि. पुणे, अजय मोरसिंग बिरावत, एकानंद मोरसिंग बिरावत, रामू बकाराम लांजेवाल तिघे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे, अनिल अर्जुन गायकवाड रा. मलठण ता. शिरूर जि. पुणे, विश्वास सुखदेव भोरडे रा. पिंपरी सांडस ता. हवेली जि. पुणे, अविनाश रामकृष्ण डफळ रा. धामारी ता. शिरूर जि पुणे तसेच शिवदास दोसासिंग नानावत रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे या बारा जणांना गणेशोत्सव व मोहरम काळामध्ये शिरूर तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व पोलीस नाईक विलास आंबेकर यांनी दिली .