शिक्रापुरातील ‘त्या’ वाळूच्या गाडीची पुन्हा एकदा ‘जादू’, वाळू निघाली 3 ऐवजी 8 ब्रास वाळू ! महसुल कारवाई करणार, पोलिसांचे काय ?

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन (सचिन धुमाळ) –  शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वाळूची गाडी पकडून शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिला असता त्या गाडीमध्ये राञीत वाळू ऐवजी क्रश सॕण्ड खडी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता .यामध्ये चौकशीचे नाट्य रंगलेले असताना. शिक्रापुरच्या तलाठ्याने केलेला पंचनामा अडीच ते तीन ब्रासचा असताना आज पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फेर पंचनामा केला असता त्या गाडीमध्ये आता तब्बल ८.२० ब्रास वाळू असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा महसुलच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

२२ जुलै रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने वाळुची वाहतुक करणाऱ्या हायवा (एम एच १४ एच जी ७२९१) या गाडीवर कारवाई करत ताब्यात घेत शिक्रापुर पोलीसांच्या ताब्यात दिली होती .त्यानंतर वाळूच्या गाडीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने शिक्रापूर गाव कामगार तलाठी अविनाश जाधव यांनी पंचनामा करत डंपरमध्ये अंदाजे अडीच ते तीन ब्रास वाळू असल्याचा पंचनामा केला होता, मात्र वाळुने भरलेल्या हायवा डंपर (गाडी) शिक्रापुर पोलीसांच्या ताब्यात असताना वाळूचा दंड चुकविण्यासाठी वाळूच्या डंपरमध्ये वाळूच्या वर क्रश सॕण्ड खडीचा थर टाकण्यात आला होता. डंपर मधील वाळूच्या ब्रास बाबत शंका असल्याने आणि शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये वाळूच्या डंपर मध्ये रातोरात क्रश सॕण्ड खडी आल्याच्या वृत्ताने अनेकांची झोप उडविली होती.त्यामुळे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या डंपरचा (गाडी) पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता एस. टी. मूरकुटे यांनी मंडलाधिकारी राजेंद्र आळणे, तलाठी अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत सदर वाळूच्या डंपरचा पंचनामा केला असता त्या वाळूच्या डंपर मध्ये तब्बल ८.२० ब्रास वाळू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्रापुर गाव कामगार तलाठी यांनी केलेला पंचनामा एक प्रकारे शासन व महसूल विभागाचा फसवणूक करणारा असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर आता या डंपर मधील वाळूच्या पंचनाम्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली असल्याने सदर तलाठ्यावर कारवाई करणारअसल्याचे समजते.

शिरूर तालुक्यात महसुल विभागाकडून सतत वाळूच्या वाहनांवर कारवाई होत असते त्यानंतर महसूल विभागाचे वतीने वाहनावर संबंधित तलाठी पंचनामा करत असतात .आणि त्यानुसार तहसीलदार दंड ठोठावतात, माञ याप्रकरणात एका वाहनामध्ये तब्बल पाच ब्रास वाळूचा फरक तलाठ्यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये आढळून आला आहे, त्यामुळे यापूर्वी देखील तलाठ्यांनी कमी पंचनामा करून शासनाचा तसेच महसूल विभागाचा किती महसुल बुडवत फसवणूक केली असेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

याबाबत शिरूरचे प्रांत संतोष देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सदर प्रकारात संपूर्णपणे दंड वसूल केला जाईल. तसेच संबंधित गावकामगार तलाठी यांच्यावर देखील कारवाई केली जाईल.

शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये वाळूच्या डंपरमध्ये क्रश सॕण्ड टाकण्याचा जो प्रकार झाला त्याचा पंचनामा करणाऱ्या तलाठ्याने कमी पंचनामा दाखविल्याने तो दोषी असल्याचे समोर आल्याने त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.मात्र गाडीत क्रश सॕण्ड टाकण्याचा प्रकार पोलिस स्टेशनच्या आवारात घडला असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय गाडीत क्रश सॕण्ड टाकण्याचे एवढे मोठे धाडस कोणी करणार नाही हे ही तितिकेच खरे! माञ याबाबत पोलिसांकडून अद्याप पर्यंत देखील कोणावर कोणतीही कारवाई झाली नाही. मग या प्रकाराला फक्त महसूलच दोषी का ?” का महसुलला एक न्याय” आणि “पोलिसांना एक न्याय” असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

याविषयी बोलताना दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले की शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये वाळूच्या गाडीमध्ये क्रशसॕण्ड टाकण्याचा जो प्रकार समोर आला आहे. याबाबत सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु आहे. जे कोणी दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

माञ आता या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिप पाटिल यांनी लक्ष घालत संबधितावर कारवाई करणे गरजेचे आहे.