शिक्रापुर : शिवसेनेत गटबाजी ? जिल्हाप्रमुखांचा फोटो होर्डिंग वरुन ‘गायब’

शिक्रापुर : वाघोली ता.हवेली येथील शिवेसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते व पुणे जिल्हा युवासेनेचे माजी जिल्हाप्रमुख विशाल सातव यांची शिवसेना युवासेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने वरुण सरदेसाई यांनी पुणे जिल्ह्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये विशाल सातव यांच्यावर राज्याच्या सहसचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या निवडीनंतर विशाल सातव यांच्यावर वाघोली परिसरात कार्यकर्त्यांकडून होर्डिंग लावत अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला गेला आहे. या होर्डिंग वरती जवळपास शिवसेनेच्या सर्वच आजी-माजी सर्व पदाधिकाऱ्यांचे फोटो घेण्यात आले आहेत .परंतु
शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख यांचा फोटो या होर्डिंग नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.तर पुणे जिल्ह्यात शिवसेनेमध्ये नवीन कार्यकर्त्यांचा एक गट आणि जुन्या कार्यकर्त्यांचा एक गट असल्याचे देखील खाजगीत बोलले जात आहे. या जुन्या आणि नवीन गटाच्या वादातूनच जिल्हाप्रमुख यांचा फोटो होर्डिंग वरून गायब झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे विशाल सातव यांच्या निवडीनंतर सोशल मीडियावर सह विशाल सातव यांना भेटून अनेकांनी शुभेच्छा दिल्या त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले यामध्ये देखील जिल्हाप्रमुख कुठेही दिसून आले नाहीत.

जिवलग सहकाऱ्यांकडून हे होर्डिंग लावण्यात आलेले आहे त्यामुळे या वरील फोटो बाबत मला कुठल्याही प्रकारे कल्पना नाही

विशाल सातव (युवासेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव )