शिक्रापूर : ओढ्या नाल्यावरील अतिक्रमणामुळे गेला तरुणाचा जीव

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – वाघोली (ता.हवेली) परिसरात काल मुसळधार पाउस झाला. या पावसाने महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या परिसरात असलेल्या नैसर्गिक ओढ नाल्यांवरती मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले असल्याने महामार्गावर पाणी आले. या अतिक्रमणविरोधात गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे आवाज उठवत आहे त्यांनी पीएआरडीएच्या कार्यालयासमोर कित्येक वेळा आंदोलन देखील केली परंतु या निगरघट्ट पीएमआरडीएच्या अधिकारी यांना कोणतेही फरक पडला नाही.

काल वाघोली झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्या नाल्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे पुणे-नगर महामार्गावर कावेरी हाॕटेल जवळ, एच पी पेट्रोल पंप फुलमला याठिकाणी नगर रोडवर अक्षरशा एकाद्या नदीचे स्वरूप आले होते. या ठिकाणी पाणीच पाणी साचले. या पाण्यामध्ये पाच ते सहा दुचाकी वाहून गेल्या तर निमित अशोक अहेरवाल (वय 21 वर्षे रा. सणसवाडी) हा तरुण वाहुन गेल्याने त्याला आपला जीव देखील गमवावा लागला त्यात त्याच्या बरोबर असलेल्या दोन महिलांना सुखरूप रित्या बचावल्या.

तर भाडाळे वस्ती येथे राहणार युवक संभाजी गोडगे याने पाण्याच्या प्रवाहात गाडी सह वाहत असताना गाडी सोडून दिल्याने त्याचा जीव वाचला. त्यामुळे आता या तरुणाच्या मृत्यूस जबाबदार कोण ? असा प्रश्न पंचायत समिती सदस्य सर्जेराव वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. आता तरी येणाऱ्या काळात पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना जाग येणार का ? आणि ओढ्या नाल्यावर केलेली अतिक्रमणे काढून पूर्वीप्रमाणे नैसर्गिक ओढे-नाले खुले करणार का ? हादेखील एक मोठा प्रश्न आहे.

आता दोन दिवसात सगळे विभाग व त्यांचे अधिकारी जागे होणार या भागाची पाहणी करणार. आहवाल सादर करणार असे सांगून निघून जाणार आणि नंतर पुढच्या वर्षी पावसाळ्यात परत पाहणी करण्यासाठी येणार आणि मग पुन्हा पाउस आणि एखाद्या व्यक्तीच्या जीव जाण्याची वाट पाहणार. असा हा भोंगळ कारभार सुधारणार तरी केव्हा.

पोलिस प्रशासन, पोलिस मिञ व ग्रामस्थांच्या मदतीने राञी 11 ते सकाळी 5 प्रयत्न मदत कार्य सुरु होते. पाण्याचा प्रवाह मोठा होता. त्यातून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले काही दुचाकी स्वराना पाण्याचा प्रवाह पार करण्यास मदत केली.
– प्रताप मानकर, (पोलीस निरीक्षक, लोणीकंद)

पावसामुळे सर्वच ठिकाणी आपत्तीजणक प्ररस्थिती निर्माण झाली होती.त्यातच महामार्गावर जागोजागी पाणी साचले. याला काही प्रमाणात ओढ्यानाल्यावरील अतिक्रमणे देखील जबाबदार आहेत. सर्व संबंधित विभागाच्या आधिकारांना बरोबर घेउन परिसराची पाहणी करुन दोषीवर कारवाई करण्यास भाग पाडणार.
– अशोक पवार, (शिरुर-हवेली, आमदार)

गेल्या अनेक दिवसापासून ओढ्यानाल्यावरील अतिक्रमणा विरोधात कारवाईची मागणी करुन देखील कारवाई न झाल्याने एका निष्पाप तरुणाचा जीव गेला त्यामुळे याला जबाबदार असलेल्या पीएमआरडीए वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार.
– सर्जेराव वाघमारे ( पंचायत समिती सदस्य, हवेली )