हाक मारण्यासाठी हे गाव करतच नाही नावाचा उपयोग…

शिलाॅंग : पोलीसनामा ऑनलाईन 
गाण ऐकायंला कोणाला नाही आवडत ? आपल्या आवडीचे, मनाला भावनारे गाण प्रत्येकजण गुणगुणत असत. पण, हेच गाण वेडजर अख्या गावाला लागत तर…… असचं गाण्याचे वेड लागलयं डोगरदऱ्यांतील, जंगल कोंदणातील एका गावाला. हे गाव आहे मेघालय शिलॉग मधील  कोंगथाँग या खेडे गाव. गावाजवळ जाताच, गाण्याचा आवाज येऊ लागतो.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9e6c7adc-bc13-11e8-aff7-e38f4bd7d14e’]

या गावात उस्तादाचा मेळावा भरल्याचा आभास होतो.  हा आवाज काही पक्ष्यांनी केलेल किलबीलाट नसुन हा आवाज तर, ते गावातील नागरिकांचा आहे. या गावाची खासीयत म्हणजे, जन्मलेल्या प्रत्येकाला नामकरणाबरोबर त्याला स्वत:ची अशी एक धून देण्यात येते. खासी जमातीचे हे लोक ही धून गाऊनच प्रत्येक व्यक्तीला हाक मारतात. नावाप्रमाणेच ही धून एकदा मिळालेल्या नंतर आयुष्यभर वापरली जाते.

मुळत: या खासी जमातीत नावाचा खास असा काही उपयोग होतच नाही. बालपणी नामकरणबरोबरच ‘धुनीकरण’ केले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष नावाचा फारसा काही उपयोग गावामध्ये होत नाही. सरकारी कागद पत्रासाठीच काय तो त्यांचा नावाचा उपयोग.

[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B07811Y98Q’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fcdd9282-bc13-11e8-a708-d1f94b3ca521′]

आई आपल्या मुलाला जेवणासाठी हाक मारत असो वा खेळणारी मुले एकमेकांशी बोलत असोत सर्वजण या सांगितिक भाषेतच संवाद साधताना येथे पाहायला मिळते. “ही सगळी संगीतधून निर्माण करण्याची प्रक्रीया अगदी हृदयापासून सुरु होते” असं मत पींडाप्लीन या महिलेने व्यक्त केले. पींडाप्लीन  त्यांना तीन मुले असून तिन्ही मुलांशी त्या गाण्यातच संवाद साधतात. ३१ वर्षांच्या पींडाप्लीन यांना गाणे हे प्रेमाचे प्रतिक आहे व त्या आपल्या मुलांशी असा संवाद साधून प्रेम व्यक्त करतात, असे त्यांना वाटते. या गावातील समुदायाचे प्रमुख रॉथेल खोन्गसित या संगितभाषेबद्दल स्वत:चा अनुभव सांगताना म्हणतात, जर माझ्या मुलाने काही चूक केली किंवा त्रास दिला तर मात्र मी रागाने त्यांना खऱ्या नावाने हाक मारतो. अन्यथा, मी प्रेमळ सांगितीक भाषेतच त्यांच्याशी संवाद साधतो.
राजकुमार रावच्या सल्ल्यावर ही अभिनेत्री पडली पंग्यातून बाहेर

या प्रथेला जिंगरवाइ लावबेई असे म्हणतात. त्याचा अर्थ आदिमातेचं गाणं असा होतो. कोंगथाँग खेडं गाव गेल्या अनेक पिढ्यापासून, जगापासून अलिप्त राहिलं आहे. २००० साली या गावात वीज आली. तर, साधा मातीचा रस्ताच २०१३ साली तयार करण्यात आला. दिवसभर गावातील लोक जंगलामध्ये गवत आणि इतर वस्तू गोळा करण्यासाठी जातात त्यामुळं गावात फक्त मुलंच राहातात. जंगलामध्ये लांबलांब असणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुमारे यांची ही ३० सेंकदांची धून या लोकांना उपयोगी पडते. आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहातो. जशी पक्ष्यांना , प्राण्यांना स्वत:ची ओळख असते, ते एकमेकांशी विशिष्टप्रकारे संवाद साधतात तसेच आम्हीही साधतो, असे खोन्गसित यांनी सांगितले.

‘हिजडा’ कथेने रचला इतिहास