Shilpa Shetty | शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक, जुहू पोलीस ठाण्यात FIR दाखल, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्रामुळे (Raj Kundra Case) सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चर्चेत आली आहे. या प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) अडचणीत वाढ होत आहे. पोलिसांकडून शिल्पाची देखील चौकशी केली जात आहे. याच दरम्यान शिल्पा शेट्टीच्या आईची फसवणूक झाल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. शिल्पाची आई सुनंदा शेट्टी (sunanda shetty) यांनी मुंबईतील (Mumbai Police) जुहू पोलीस ठाण्यात (Juhu Police Station) जमीन प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर एफआयआर (FIR) दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुनंदा शेट्टी यांनी सुधाकर घारे (Sudhakar Ghare) याच्या विरोधात ही तक्रार दिली असून ते मुळचे कर्जत जिल्ह्यातील (Karjat district) रायगडचे शेतकरी आहेत. सुनंदा यांनी मे 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान सुधाकर यांच्याकडून कर्जत येथील एका जमिनीचा व्यवहार केला होता. यावेळी जमीन ही स्वत:च्या नावावर असल्याचे सांगून सुधाकरने जमीन व बंगल्याची खोटी कागदपत्रे (Fake documents) बनवून सुनंदा यांना हे सर्व 1 कोटी 60 लाखांना विकले. काही दिवसांनी ही बाब सुनंदा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुधाकर घारे या व्यक्तीकडे पैशांची मागणी केली.

सुधाकर घारे हा एका राजकीय नेत्याच्या (political leader) जवळचा हस्तक असल्याचे सांगितले
जाते. मात्र, पैसे परत करणार नाही, कोर्टात जा अशी धमकी सुधाकरने दिली असे सुनंदा शेट्टी यांनी
तक्रारीत म्हटले आहे. यानंतर सुनंदा शेट्टी यांनी अंधेरी कोर्टात (Andheri Court) धाव घेतली. कोर्टाने त्यांचे प्रकरण ऐकून घेत जूहू पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले. यानंतर जुहू पोलिस ठाण्यात सुधाकर घारे विरोधात 406, 409, 420, 462, 467, 468, 471, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करुन चौकशी सुरु केली आहे.

हे देखील वाचा

Raj Thackeray | भाजपने केलेल्या कामांचे ‘स्टींग ऑपरेशन’ करा

OBC Reservation | मोदी सरकारचा मोठा निर्णय, मेडिकल प्रवेशात ओबीसींना 27 % आरक्षण

Pune Metro | उद्या पुणे मेट्रोची वनाज ते आयडियल कॉलनी ‘ट्रायल रन’?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Shilpa Shetty | actress shilpa shetty s mother sunanda shetti filed a case of cheating and forgery

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update