शिल्पा शेट्टी आणि बहीण शमिता विरोधात २१ लाखांचे कर्ज बुडवल्याची तक्रार 

मुंबई : वृत्तसंस्था – अभिनेत्री शिल्पा शेट्टी बहिण शमिता आणि आई सुनंदा यांच्यावर एका व्यावसायिकाने २१ लाखांचे कर्ज बुडवण्याचा आरोप केला आहे. शिल्पाचे वडील सुरेंद्र शेट्टी यांनी माझ्या कडून व्यवसायासाठी २१ लाख रुपये कर्ज घेतले होते. २०१७ पर्यंत  व्याजासकट कर्जाची परतफेड होणं अपेक्षित होतं मात्र सुरेंद्र शेट्टी यांच्याकडून कर्जफेड झाली नाही असा आरोप या व्यावसायिकाचा आहे. या दरम्यान शिल्पा शेट्टीच्या वडिलांचं निधन झालं त्यामुळे हे कर्ज तिघींनी लवकरात लवकर फेडावं अशी मागणी या व्यावसायिकाने केली आहे.

याप्रकरणी शिल्पा आणि तिच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. वडिलांनी अशाप्रकारचं कोणतंही कर्ज घेतलं नव्हत, परहद दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे असं शिल्पाचं म्हणणं आहे. या प्रकरणी २१ लाख रुपये शेट्टी कुटुबींयांनी बुडवले असल्याची तक्रार परहदनं दाखल केली आहे.

सुरेंद्र शेट्टी यांच्याशी आपले घनिष्ठ संबध होते. २०१५ मध्ये त्यांनी माझ्याकडून २१ लाख रुपये व्यवसायासाठी कर्ज म्हणून घेत होते. ज्याची २०१७ मध्ये परतफेड होणं अपेक्षित होतं असं व्यावसायिक परहद आमरा यांचं म्हणणं आहे. मात्र शेट्टी कुटुबींयांनी कर्ज फेडायला नकार दिल्याचा परहदचा आरोप आहे.आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे.