Video : शिल्पा शेट्टी वडापाव पाहून झाली ‘आउट ऑफ कंट्रोल’, अन्…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आपल्या शानदार फिटनेससाठी खूपच फेमस आहे. यासाठी ती आपल्या फिटनेसचीही विशेष काळजी घेत असते. परंतु नुकतीच ती तिच्या डाएटला चीट करत ती फेमस स्ट्रीट फूड वडापाव खाताना दिसली. शिल्पाचा वडापाव खातानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

शिल्पानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती वडापावचा आनंद घेताना दिसत आहे. जणू काही वडापाव खाताना तिचा कंट्रोल सुटत आहे, असंच काहीसं यात दिसत आहे. तिनं सांगितलं की अलीकडेच ती कर्जतवरून परत आली आहे. ही तिच्या खाण्याची स्पेशल प्लेस आहे. इथं तिनं वडापावच नाही तर सामोसेही आणि कांदा भजीही खाल्ली आहेत. तिन व्हिडिओला खास कॅप्शनही दिलं आहे.

शिल्पाचा हा व्हिडिओ समोर येताच क्षणात व्हायरल होताना दिसला. चाहते तर तिला असं पाहून अवाक् झाले आहेत. अनेकांनी तिच्या व्हिडिओवर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती निकम्मा आणि हंगामा 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमांमधून शिल्पा पुन्हा वापसी करणार आहे. हंगामा 2 मध्ये शिल्पा परेश रावल आणि मीजान जाफरी तर निकम्मामध्ये ती अभिमन्यू दसानी आणि शर्लिन सेठीयासोबत दिसणार आहे.