मुलासोबत पुलमध्ये शिल्पा शेट्टी करते मस्ती, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून थाइलंडमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहे. मुलगा वियान यांच्यासोबत एन्जॉय केलेला व्हिडिओ शिल्पा शेट्टीने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहले आहे की, ”Morning holiday workout Holidays be like” या व्यतिरिक्त शिल्पाने अनेक फोटो व्हिडिओ शेअर केले आहेत. शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुलगा वियानसोबत ती मस्ती, धमाल करताना दिसत आहे. दोघांची बॉंन्डिंग पाहून चाहत्यांनी व्हिडिओला खुप लाईक केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/BxTzUrehg2k/

शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान कुंद्रा हा सोशल मिडियावर एका सेलिब्रिटीप्रमाणेच आहे. त्याचे ही फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपुर्वी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये वियान त्याची आजी सुनंदा शेट्टी यांचे पाय दाबताना दिसले. सोशल मिडियावर वियानचे खुप कौतुक झाले. याआधी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये वियान साउथ सुपरस्टार प्रभासची अॅक्टिंग करताना दिसून आला. हा व्हिडिओ देखील सगळ्यांना आवडला.