शिल्पानं फोटोग्राफर्सला पाहून लपवला मुलगी समीशाचा चेहरा ! समोर आला पहिला फोटो

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आई झाल्यानंतर खूपच खूश आहे. याचा आनंद ती कायमच सोशलवर व्यक्त करत असते. मुलगी समीशाचा फोटो तिनं अद्यापही सोशलवर शेअर केलेला नाही.

अलीकडे ती एका ठिकाणी स्पॉट झाली होती. मुलीला कडेवर घेऊन ती कारमधून उतरताना दिसली होती. परंतु फोटोग्राफर्सला पाहिल्यानंतर ती समीशाचा चेहरा लपवताना दिसली.

शिल्पाची मुलगी समीशाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. आता ती संधी अखेर समोर आली. समोर आलेल्या फोटोत समीशाचा चेहरा दिसत आहे.

फोटोत समीशा खूपच क्यूट दिसत आहे. चाहत्यांना पहिल्यांदाचा समीशाचा चेहरा पाहायला मिळाला आहे.

शिल्पा शेट्टीनं सोशलवर समीशाचे अनेक फोटो आजवर शेअर केले आहेत. परंतु या साऱ्या फॅमिली फोटोत समीशाचा चेहरा कधीही दिसला नाही.

शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि राज कुंद्रा काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा पॅरेंट्स बनले. सरोगसीनं शिल्पाच्या घरी नन्ही परी आली. 15 फेब्रुवारी 2020 रोजी समीशाचा जन्म झाला आणि 21 फेब्रुवारी रोजी शिल्पानं सोशल मीडियावरून ही बातमी सर्वांसोबत शेअर केली.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती निकम्मा आणि हंगामा 2 या सिनेमात काम करताना दिसणार आहे. या सिनेमांमधून शिल्पा पुन्हा वापसी करणार आहे. हंगामा 2 मध्ये शिल्पा परेश रावल आणि मीजान जाफरी तर निकम्मामध्ये ती अभिमन्यू दसानी आणि शर्लिन सेठीयासोबत दिसणार आहे.

You might also like