‘खिलाडी’ अक्षय कुमारवर शिल्पा शेट्टीने केले होते ‘हे’ धक्कादायक आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री शिप्ला शेट्टीचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे शिल्पा चर्चेत आली आहे. शिल्पा ही एक उत्तम अभिनेत्री असून ती आपल्या हॉटनेसमुळे ओळखली जाते. तुम्हाला सांगू इच्छितो की, शिल्पाच्या लग्नाआधी तिच्या अक्षय कुमार सोबतच्या अफेअरच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. या कथित रिलेशनशिप आणि अफेर्समुळे शिल्पा चांगलीच चर्चेत आली आहे. ज्या अभिनेत्रीचं नाव अक्षय कुमार सोबत सर्वाधिक वेळा जोडलं गेलं आहे ती अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे.

असे म्हटले जात आहे की, ‘मै खिलाडी तू अनाडी’ या सिनेमाच्यावेळी दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली आहे. यानंतर धडकन या सिनेमात ते शेवटचे एकत्र दिसले होते. अक्षय सोबतच्या नात्यावर भाष्य करत 2000 साली शिल्पा म्हणाली होती की, माझ्या आणि अक्षयच्या ब्रेकअपचं कारण हे आहे की, अक्षय माझ्यासोबतच माझी बेस्ट फ्रेंड ट्विंकल सोबतही होता. मला असं कधीच वाटलं नव्हतं की तो माझ्यासोबत असे काही करेल.”

‘अक्षयने माझा वापर केला आहे’

शिल्पा म्हणाली की, “‘ट्विंकल साठी माझ्या मनात काहीच नाही. मी तिच्यावर अजिबात अपसेट नाही. जर माझाच पार्टनर मला चीट करत असेल तर यात तिची काय चूक आहे. अशात मी कोण्या दुसऱ्या महिलेला दोष का देऊ ? हा फक्त आणि फक्त अक्षयचा दोष आहे. अक्षयने माझा वापर केला आहे.”

‘मी पु्न्हा कधीच अक्षय सोबत काम करणार नाही’

शिल्पा म्हणते की, “त्याला दुसरे कोणी भेटल्यामुळे त्याने मला सोडून दिले. मी फक्त त्या एका माणसावर अपसेट आहे. आणि तो म्हणजे अक्षय आहे. मला विश्वास आहे की, त्याने जे केलं ते फिरून पुन्हा त्याच्याकडे नक्की येईल. हे सगळं विसरणं इतकं सोपं नसतं. मी नशीबवान आहे की हे सगळं सहन करण्यासाठी आणि त्यातून बाहेर येण्यासाठी मी सक्षम आहे. आज तो एक विसरलेला अध्याय आहे. मी त्याच्यासोबत पुन्हा कधीच काम करणार नाही.