भांग पिऊन धमाल नाचली होती शिल्पा शेट्टी, मित्रांसोबत केला होता नागिण डान्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार शिल्पा शेट्टी टीव्हीच्या दुनियेत नेहमीच सक्रिय असते. अलीकडेच शिल्पानं आपल्या कुटुंबियांसोबत होळी साजरी केली. शिल्पाच्या घरी नेहमीच होळीची पार्टी आयोजित केली जाते. शिल्पा दरवर्षी कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत होळी साजरी करत रंग खेळताना दिसत असते. 2017 साली तिचा असाच एक व्हिडीओ समोर आला होता जो व्हायरल होताना दिसला होता.

शिल्पाचा पती राज कुंद्रानं हा व्हिडीओ इंस्टावरून शेअर केला होता. व्हिडीओत शिल्पा भांगच्या नशेत चूर झाल्याचं दिसलं. तिनं तिची मैत्रीण रोहिणी अय्यर सोबत नागिन डान्स केला. शमिता शेट्टीनं तिचा व्हिडीओ शुट केला होता. शिल्पाचा हा व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओ शेअर करताना राज कुंद्रानं मजेदार कॅपशन दिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, दोन घोट भांग पिण्याचा हा परिणाम आहे.” त्या वर्षी शिल्पानं तिच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर होळी साजरी केली होती.

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नुकतेच निकम्मा आणि हंगामा 2 हे सिनेमे साईन केले आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वीच शिल्पा सुपर डान्सर चॅप्टर 3 हा डान्स रिअ‍ॅलिटी शो जज करताना दिसली होती.