Shilpa Shetty Nora Fatehi Dance | शिल्पा शेट्टी-नोरा फतेही अशा थिरकल्या की, पहाणारे पाहतच राहिले (Video)

नवी दिल्ली : Shilpa Shetty Nora Fatehi Dance | जेव्हा जेव्हा बॉलिवूडमधील सुंदर आणि हॉट अभिनेत्रींची चर्चा होते या यादीत शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांची नावे येतात. सौंदर्यासोबतच फिटनेस आणि डान्समध्ये दोघी एकापेक्षा एक सरस आहेत. अशावेळी बॉलिवूडच्या या दोन टॉप अभिनेत्री एकाच मंचावर एकत्र दिसल्या तर? होय, तेच झाले. (Shilpa Shetty Nora Fatehi Dance)

 

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty Dance ) आणि नोरा फतेही (Nora Fatehi Dance) डान्स रिअ‍ॅलिटी शो ’डान्स दिवाने ज्युनियर्स’च्या सेटवर डान्स करताना दिसल्या. खरं तर शिल्पा या शोमध्ये तिच्या आगामी ’निकम्मा’ (Nikamma) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सहकलाकार अभिमन्यू दासानी आणि शर्ली सेट्टासह शोमध्ये आली होती. यावेळी शिल्पा आणि नोराने ’बाबूजी जरा धीरे चलो’ या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला.

 

 

जज नीतू कपूर (Neetu Kapoor) आणि मर्झी पेस्टिनजी यांनीही नृत्याचा आनंद लुटला. निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा प्रोमो व्हिडिओ रिलीज केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला आहे. लोक नोरा-शिल्पाच्या डान्सचा आनंद लुटताना दिसत आहेत.

 

व्हिडीओच्या सुरुवातीला शिल्पा शेट्टी ’बाबूजी जरा धीरे चलो’वर नाचू लागल्याचे दिसत आहे. तिच्या बॅकराऊंडला बाल स्पर्धक देखील आहेत. यावेळी शिल्पा लाल रंगाच्या सुंदर आउटफिटमध्ये दिसली. त्याचवेळी नोरा ब्लू कलरच्या आउटफिटमध्ये तिच्या डान्सिंग मूव्हज दाखवताना दिसली. नीतू कपूर आणि मर्झी या दोघींच्या नृत्याचा आनंद घेताना दिसल्या.

शिल्पा शेट्टी कुंद्रा (Shilpa Shetty Kundra) सध्या तिच्या निकम्मा चित्रपटाचे प्रमोशन करत असून ती स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.
नुकताच तिचा ग्रेसफुल लूक समोर आला आहे, ज्यामध्ये ती साडीत दिसत आहे.
ती सर्व प्रकारच्या आउटफिट्समध्ये खूप सुंदर दिसते. विशेषतः इंडो वेस्टर्न टच तिच्या कपड्यांमध्ये
जिवंतपणा आणण्याचे काम करतो. निकम्मा हा चित्रपट 17 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title :- Shilpa Shetty Nora Fatehi Dance | shilpa shetty nora fatehi danced like this the viewers were stunned

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा