Shilpa Shetty – Raj Kundra | शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती बिझनेसमन राज कुंद्रा (Shilpa Shetty – Raj Kundra) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पॉर्नोग्राफी (Pornography Case) प्रकरणामुळे दोघं आधीपासून अडचणीत सापडले आहेत. यातच त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता त्याचं नाव आणखी एका प्रकरणात पुढे आलं आहे. मात्र यावेळी राज कुंद्रासोबत शिल्पाचेही (Shilpa Shetty – Raj Kundra) नाव पुढे आले आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात (Bandra Police Station) फसवणूक (Fraud) आणि धमकावल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये (Bandra Police Station) नितीन बराई (Nitin Barai) नावाच्या व्यक्तीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी,
तिचा पती राज कुंद्रा (Shilpa Shetty – Raj Kundra), काशिफ खान (Kashif Khan) यांच्यासह काही लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हे प्रकरण 2014 चं असून तक्रारीनुसार राज, शिल्पानं बरई यांची एक कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.

 

काय आहे प्रकरण?

 

नितीन बराई यांच्या तक्रारीनुसार 2014 मध्ये SFL फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे (SFL Fitness Pvt) संचालक काशिफ खान,
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी पीडितेला फिटनेस व्यवसायात 1 कोटी 51 लाख रुपयांची गुंतवणूक (Investment) करण्यास सांगितले होते.
जर त्यानं यांच्या कंपनीची फ्रांचायजी घेतली आणि पुण्याच्या कोरेगाव (Koregaon, Pune) परिसरात स्पा आणि जीम (Spa and gym) सुरु केली तर खूप फायदा होईल.
परंतु नंतर काही सुरळीत न झाल्यानं आरोपींनी त्यांचे परत मागितले. त्यानंतर त्यांना धमकावण्यात आलं.

 

बरई यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी कलम 406,409,420,506,34,120(B) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलीस या प्रकरणी सर्वांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची बाजू जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून त्यांना लवकर संपर्क करण्यात येण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Shilpa Shetty – Raj Kundra | fir lodged against shilpa shetty and raj kundra 1 51 crore cheating case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | कार्ला परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या ‘अश्लिल’ डान्स पार्टीवर लोणावळा पोलिसांची धाड ! 8 महिलांसह 17 जणांवर FIR, 74 लाखांचा मुद्देमाल जप्त

Rachita Ram | कन्नड अभिनेत्री रचिता रामने ‘मधुचंद्रा’च्या रात्री बाबत केलं अत्यंत वादग्रस्त विधान, होतोय जोरदार विरोध

Amravati Violence | अमरावतीमध्ये संचारबंदी लागू, पोलिसांकडून भाजपचा माजी मंत्री स्थानबध्द? (व्हिडीओ)