शिल्पा शेट्टी-राज कुंद्रांच्या अडचणीत वाढ ! मुंबईमध्ये दाखल झाली फसवणुकीची केस

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाही असं दिसत आहे. त्यांच्या नावे आता आणखी घोटाळा जमा झाला आहे. एका गोल्ड ट्रेडींग कंपनीनं शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरुद्ध फ्रॉडची तक्रार दाखल केली आहे. तक्रार करणारा व्यापारी NRI आहे.

एक वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, खार पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या या तक्रारीत म्हटलं आहे की, तक्रारदाराला सतयुग गोल्ड प्रायवेट लिमिटेडकडून फसवण्यात आलं आहे. ही कंपनी आधी राज कुंद्रा चालवत होते. तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी पूनम पांडे हिनंही राज कुंद्रांविरोधात तक्रार दाखल केली होती. पूनमनं 2019 साली Armsprime Media सोबत केलेल्या एक करारानंतर या प्रकरणाला सुरुवात झाली. ही कंपनी एक अ‍ॅप बनवणार होती. ज्याच्यातून होणाऱ्या नफ्याचा एक हिस्सा पूनमला दिला जाणार होता.

पूनमनं सांगितल्यानुसार, जेव्हा पूनमला हे समजलं की, नफ्याच्या शेअरींगमध्ये फरक करण्यात आला आहे तेव्हा तिनं हे कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं. या कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडताच तिला प्रायव्हेट नंबरवर कॉल्स यायला सुरुवात झाली. यात तिला वेगवेगळ्या विनंत्या केल्या जाताना दिसल्या. पूनमचं म्हणणं आहे की, तिनं याबाबत पोलिसांत तक्रार केली परंतु राज कुंद्रांविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर पूनम पांडेनं मुंबई हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला होता.

देश सोडूनही फरक पडला नाही

रिपोर्टनुसार पूनम 3 महिन्यांसाठी देशाबाहेर गेली होती. तिला वाटलं की, सर्वकाही ठिक होईल. तिनं आपला नंबरही बदलून पाहिला. परंतु यानं मात्र काहीच फरक पडला नाही.