आई बनल्यानंतर शिल्पा शेट्टी म्हणाली – ‘5 वर्षापासून दुसर्‍या मुलासाठी करत होते प्रयत्न’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड ॲक्ट्रेस शिल्पा शेट्टीनं 21 फेब्रुवारी रोजी पोस्ट शेअर केली आणि सर्वांनाच शॉक केलं. शिल्पानं पोस्ट शेअर करत सांगितलं की, ती आई झाली आहे. तिच्या घरी मुलीनं जन्म घेतला आहे. समीशाच्या जन्मामुळे ती खूपच खुश आहे असं तिनं सांगितलं. दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर शिल्पा खुश आहे. गेल्या 5 वर्षांपासून ती दुसऱ्या मुलासाठी ट्राय करत होती असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. तिला मुलगीच हवी होती. याशिवाय ती 21 वर्षांची होती तेव्हापासूनच तिनं समीशा नावाचा विचार केला होता.

शिल्पा म्हणाली, “जेव्हा मी निकम्मा साईन केला आणि हंगामासाठी आपल्या डेट्स फिक्स केल्या तेव्हा मला समजलं की, मी आणि राज फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा पॅरेंट्स बनणार आहोत तेव्हा पुर्ण फेब्रुवारीसाठी मी आणि राजनं आपलं वर्क शेड्युल पुर्ण क्लियर केलं.”

आपली टीम आणि मॅनेजरचं कौतुक करताना शिल्पा म्हणाली, “फेब्रुवारीमध्ये मला मोठा ब्रेक हवा होता. यासाठी त्या लोकांनी मला काम पूर्ण करण्यात मदत केली.” असं तिनं सांगितलं.

शिल्पानं 15 फेब्रुवारी रोजी एका मुलीला जन्म दिला. 21 फेब्रुवारी रोजी शिल्पानं मुलीच्या हातासोबतचा एक फोटो शेअर केला आणि ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली होती. शिल्पा सरोगेसीनं आई झाली आहे.