अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षी पेक्षा यंदाच्या कोरोना लाटेने हाहाकार केला असून अनेक बाधितांची संख्या वाढत आहे. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोना विषाणूने विळखा घातला आहे. शिल्पाच्या कटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. शिल्पा शेट्टीने समाज माध्यमावर याबाबत माहिती प्रसारित केली आहे.

 

 

 

 

सोशल मीडियावर पोस्ट करत शिल्पाने म्हटले की, गेले १० दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. माझ्या सासु-सासऱ्यांना कोरोना झाला. त्यांच्यानंतर समिषा, विहान, माझी आई आणि आता राज यांना कोरोना झाला आहे. हे सर्व वेगवेगळ्या रुममध्ये गृह विलगीकरणात आहेत. तसेच आमच्या घरातील २ कामगाराला देखील कोरोनाची लागण झालीय. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय सुविधेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती शिल्पा शिट्टीने दिली आहे. तसेच देवाच्या कृपेने सगळे जण बरे होत आहेत. माझी कोव्हीड टेस्ट निगेटिव्ह आलीय. नियमांनुसार सर्व खबरदारी घेतली जात आहे. BMC आणि अधिकाऱ्यांचे त्यांनी केलेल्या सहकार्याचे आम्ही आभारी आहोत. आमच्यासाठी प्रार्थना करण्याचे देखील आभार आहे असे तिने म्हटले आहे.

 

 

 

दरम्यान, शिल्पा म्हणाली की, कोणाला कोरोना असो अथवा नसो कृपया मास्क घाला, स्वच्छता ठेवा आणि सुरक्षित रहा, तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या पॉझिटिव्ह रहा, अशी दक्षता घेण्याची पोस्ट देखील शिल्पा शेट्टीने केली आहे.