Video : बदकाला घाबरून पळाली अभिनेत्री शिल्पा शेट्टी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा टीव्ही रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर चॅप्टर 3 मागील काही दिवसांपूर्वीच संपला आहे. सध्या शिल्पा आपला पती राज कुंद्रा आणि मुलासोबत लंडनमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. नुकताच शिल्पाने लंडनमधील आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, शिल्पा बदकांना खायला घालत आहे. यावेळी शिल्पाजवळ इतके बदकं येतात की, ती घाबरून तिथून पळून जाते.

आणि शिल्पा ब्रेड टाकून पळून जाते

या व्हिडीओत शिल्पाने रेड टी शर्ट आणि ब्लू रिप्ड जिन्स घातल्याचे दिसत आहे. तिच्या भोवताली खूप सारे बदकं आहेत, ज्यांना ती खायला घालत आहे. जेव्हा शिल्पाने दुसऱ्यांदा त्यांना खायला घालण्यासाठी ब्रेड हातात घेतला. तेव्हा एक बदक तिच्याजवळ येतं तेव्हा शिल्पा एकदम घाबरून जाते आणि ब्रेड टाकून पळून जाते.

https://www.instagram.com/p/BzaZG93hqjG/

‘मैं और मेरा बेटा हर साल बतखों को खाना खिलाते हैं’

शिल्पाने हा विनोदी व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, “ब्रेड के बाद क्या मैं थी, बदक की चोंच बहुत नुकीली होती है | मैं और मेरा बेटा हर साल बतखों को खाना खिलाते हैं “. या आधीही शिल्पाने एक फोटो शेअर केला होता. ज्यात शिल्पा आपला पती आणि सचिन तेंडुलकरसोबत दिसली होती.

‘प्रत्येक वर्षी सचिन तेंडुलकर सोबत फोटो शेअर करणं एक परंपरा बनली आहे’

या फोटोच्या कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिले होते की, “गरमीमधील पार्टी. सिम कंवर आणि नीरज कंवर तु्म्ही दोघेही बेस्ट होस्ट आहात. प्रत्येक वर्षी सचिन तेंडुलकर सोबत फोटो शेअर करणं एक परंपरा बनली आहे.” मोठ्या कालावधीनंतर शिल्पा बॉलिवूडमध्ये परतण्याची तयारी करत आहे.

‘त्या सिनेमातूनच मी माझ्या सिनेमातील कामाला नव्याने सुरुवात करणार’

सिनेमात परतण्याबाबत शिल्पा म्हणाली की, “हिंदी सिनेमात सोबत आजही माझं नातं कायम आहे आणि सध्या माझ्याकडे जवळपास पाच स्क्रिप्ट आहेत ज्या मी वाचत आहे. मला सिनेमात अभिनय करायचा आहे आणि या स्क्रिप्टपैकी जी मला सर्वाधिक आवडेल. त्या सिनेमातूनच मी माझ्या सिनेमातील कामाला नव्याने सुरुवात करणार आहे.”

 

पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घ्या, कारण …

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

पावसाळ्यात येणारी ‘ही’ भाजी आहे सर्वात पौष्टिक ; खा आणि रोगमुक्त व्हा

पावसाळ्यात माशांमुळे पसरू शकते रोगराई, असा टाळा उपद्रव

‘या’ कारणामुळे पावसाळ्यात ‘डोळ्यांच्या समस्या’ निर्माण होतात

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?