Shilpa Shetty | …म्हणून राज कुंद्राने भेट दिलेला बुर्ज खलिफामधील 50 कोटींचा फ्लॅट शिल्पाने विकला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या लूक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. परंतु यावेळी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिचा पती राज कुंद्रामुळे (Raj Kundra) चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी शिल्पाला पती राज कुंद्राने दुबईतील बुर्ज खलिफामध्ये (Burj Khalifa, Dubai) एक फ्लॅट भेट दिला होता. परंतु शिल्पाने तो फ्लॅट विकला.

शिल्पाचा पती राज कुंद्रा याने लग्नाच्या वाढदिवसानिमत्त 2010 मध्ये बुर्ज खलिफाच्या 19 व्या मजल्यावर फ्लॅट घेतला होता. हा फ्लॅट 50 कोटी रुपयांचा होता. राजने वाढदिवसाची गिफ्ट म्हणून तो शिल्पाला दिला होता. परंतु शिल्पाने काही दिवसांतच तो फ्लॅट विकला. या मागचं कारण म्हणजे तो फ्लॅट लहान होता आणि त्या फ्लॅटच्या खिडक्या उघडू शकत नव्हत्या. तसेच शिल्पाचा मुलगा विवानला (Vivan) मोकळ्या जागेत राहायला आवडतं आणि फ्लॅटच्या खिडक्या उघडू शकत नसल्याने त्याला त्रास होत होता. म्हणून शिल्पाने तो फ्लॅट विकला.

राज कुंद्राला अटक

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला सोमवारी मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai Crime Branch) अटक (Arrest) केली. अश्लिल चित्रफित (Pornography) बनवणे आणि साइट्सवर अपलोड करणे या गुन्ह्यासाठी त्याला अटक करण्यात आली आहे. पण आधीही अनेकवेळा राज कुंद्रा विवादात सापडला होता.

हे देखील वाचा

Lonavala News | लोणावळ्यात कोरोना नियमांचे उल्लंघन; दोन दुकानांना प्रत्येकी 10 हजार रुपये दंड

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

Uddhav Thackeray | कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाला साकडे

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Shilpa Shetty sold the 50 crore flat in burj khalifa know the reason dcp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update