‘लॉकडाऊन’मध्ये शिल्पा शेट्टीनं सांगितला 21 दिवसांचा ‘वेटलॉस प्रोग्राम’ ! डाएटबद्दलही दिली महत्त्वाची माहिती

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. अशात अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या पती राज कुंद्रा आणि कुटुंबियांसोबत टाईम स्पेंड करताना दिसत आहे. अलीकडेच शिल्पा शेट्टीनं एक व्हिडीओ शेअर करत सांगितलं की, कोणतेही इक्विपनेंट न वापरता स्वत:ला फिट कसं ठेवावं. तिनं एक वेटलॉस प्रोग्राम चाहत्यांसोबत शेअर केला आहे. इंस्टावरून तिनं याबाबत माहिती दिली आहे.

शिल्पा शेट्टीनं फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत 21 दिवसांचा वेटलॉस प्रोग्राम तयार केला आहे. तिच्या मोबाईल अॅपवर हा प्रोग्राम फ्रीमध्ये पाहिला जाऊ शकतो. लोकांना फिट राहण्यासाठी नक्कीच हा प्रोग्राम उपयोगी पडेल यात शंका नाही. कारण शिल्पानं ही पोग्राम तिच्या डाएट प्लॅनसहित शेअर केला आहे. आपल्या अॅपवरून ती हे सारं फ्रीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवत आहे.

डाएट प्रोग्रामबद्दल बोलताना शिल्पा शेट्टी म्हणाली, “या काळात लोकांनी मेंटली आणि फिजिकली फिट राहणं खूप गरजेचं आहे. मी देशवासियांसाठी फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत माझ्या अॅपमध्ये 21 दिवसांचा वेटलॉस प्रोग्राम घेऊन आले आहे. आशा आहे की यात लोक मोठ्या संख्येनं पार्टीसिपेट करतील.हेल्थ इज वेल्थ. 21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये आपल्या आरोग्यावर लक्ष देण्यासाठी याहून चांगली संधी मिळणार नाही.”

शिल्पाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं नुकतेच निकम्मा आणि हंगामा 2 हे सिनेमे साईन केले आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वीच शिल्पा सुपर डान्सर चॅप्टर 3 हा डान्स रिअॅलिटी शो जज करताना दिसली होती.